आष्ट्यात बाजार समितीतर्फे केळी, आंबे व फळांचे सौदे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 04:21 IST2021-05-03T04:21:45+5:302021-05-03T04:21:45+5:30
आष्टा : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने आता आष्टा येथील उपबाजारात सोमवारी ( दि. ३) सकाळी नऊ वाजता केळी, ...

आष्ट्यात बाजार समितीतर्फे केळी, आंबे व फळांचे सौदे
आष्टा : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने आता आष्टा येथील उपबाजारात सोमवारी ( दि. ३) सकाळी नऊ वाजता केळी, आंबे व इतर फळांचे सौदे सुरू होणार आहेत, अशी माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अल्लाउद्दीन चौगुले यांनी दिली.
चौगुले म्हणाले, आष्टा शहरात हळदीचा उपबाजार सुरू करण्यात आला आहे. याला परिसरातील शेतकऱ्यांनी व खरेदीदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. माजी आमदार स्व. विलासराव शिंदे व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी हळद बाजार सुरू करण्यात आला. मंत्री जयंत पाटील व युवक नेते प्रतीक पाटील यांच्या सहकार्याने आष्टा शहरात केळीचे सौदे सुरू करण्यात आले. सोमवारी (दि. ३) आष्टा येथील केळी व फळ मार्केटमध्ये केळी व फळांचे सौदे सकाळी ठीक नऊ वाजता होतील. तरी सर्व शेतकरी, आडते व खरेदीदार व्यापारी यांनी वेळेत उपस्थित राहावे. सौद्यावेळी शासनाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे. सोशल डिस्टन्स व मास्कचा वापर बंधनकारक आहे.