शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: कृष्णा नदीतील उपसा बंदी शिथिल, शेतीचा पाणीपुरवठा सुरु; पिण्याच्या पाण्याचा आठवड्याचा प्रश्न सुटला

By अशोक डोंबाळे | Updated: June 19, 2023 12:37 IST

सांगली पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता ज्योती देवकर यांनी विद्युतपुरवठा पूर्ववत करण्याच्या महावितरणला दिल्या सूचना

सांगली : कोयना धरणात पाणीसाठा कमी असल्यामुळे कृष्णा नदीवरील शेतीच्या सर्व पाणी योजनांसाठी दि. १४ ते १९ जूनपर्यंत उपसाबंदी आदेश पाटबंधारे विभागाने लागू केला होता. पण, सध्या कोयना धरणातील सोडलेल्या पाण्यामुळे कृष्णा नदीत पुरेसा पाणीसाठा असल्यामुळे दि. १९ जूनपासून कृष्णा नदीतील उपसा बंदी पूर्ण शिथिल केली आहे. या योजनांचा विद्युत प्रवाह पूर्ववत करण्याच्या सूचना महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत, अशी माहिती सांगली पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता ज्योती देवकर यांनी दिली.कोयना धरणात ११.५३ टीएमसी, तर वारणा (चांदोली) धरणात ११.१८ टीएमसी पाणीसाठा असून, तो पुरवणे अत्यावश्यक आहे. धरणातील पाणीसाठ्याचा विचार करून कृष्णा नदीतून दि. १४ ते १७ जून या चार दिवसांसाठी उपसाबंदी आदेश लागू केला होता. कृष्णा नदीतील साटपेवाडी बंधाऱ्यावर ताकारी सिंचन योजनेसाठी पाणीसाठा केला होता. ती योजना बंद केल्यामुळे साटपेवाडी बंधाऱ्यातून पाणी सोडून तीन दिवस झाले तरीही ते पाणी कृष्णा नदीतून सांगलीपर्यंत येऊ शकले नाही. म्हणून अधिकाऱ्यांनी दि. १९ जूनपर्यंत उपसाबंदी आदेश वाढविला होता. अखेर कोयना धरण आणि साटपेवाडी बंधाऱ्यातून सोडलेले कृष्णा नदीतील पाणी सांगलीत आले आहे. यामुळे पिण्याच्या पाण्याचा आठवड्याचा प्रश्न सुटला आहे. म्हणून कार्यकारी अभियंता ज्योती देवकर यांनी कृष्णा नदीतील शेतीच्या सर्व पाणी योजनांसाठी उपसाबंदी आदेश उठविला आहे. महावितरणला वीजपुरवठा सुरळीत करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

टॅग्स :SangliसांगलीriverनदीWaterपाणीmahavitaranमहावितरण