शेतकऱ्यांसाठी बांबू लागवड फायदेशीर : पाशा पटेल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:29 IST2021-02-09T04:29:48+5:302021-02-09T04:29:48+5:30
मिरजेतील किशोर पटवर्धन यांच्या बाबू लागवडीस पाशा पटेल यांनी भेट दिली. पटेल म्हणाले, हवेतील कार्बन शोषून घेण्याची ...

शेतकऱ्यांसाठी बांबू लागवड फायदेशीर : पाशा पटेल
मिरजेतील किशोर पटवर्धन यांच्या बाबू लागवडीस पाशा पटेल यांनी भेट दिली. पटेल म्हणाले, हवेतील कार्बन शोषून घेण्याची ताकद फक्त बांबूत आहे. अडीचशे वर्षापूर्वी इंधनाचा शोध लागला. त्यावेळी झाडे ३३ टक्के होती. आता झाडे संपली आहेत. सांगली जिल्ह्यात केवळ पाच टक्के झाडे आहेत. कार्बनचे प्रमाण वाढत असल्याने झाडे लावली पाहिजेत. पृथ्वीवरील कार्बन खाणारी झाडे कमी झाल्याने हवेतील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होत आहे. कार्बनचे प्रमाण असेच वाढत राहिल्यास मनुष्याचे जगणे कठीण होणार आहे. मानवाचे आरोग्य चांगले राहण्यासाठी बांबू लागवड महत्वाची आहे. बांबूपासून इथेनॉल, ब्रश, टॉवेल अशा अनेक वस्तू निर्माण होतात. एका एकरात शेतकऱ्यांना एक लाख रुपये उत्पन्न मिळते.
यावेळी किशोर पटवर्धन, डॉ. मनोज पाटील, मकरंद देशपांडे, नगरसेवक संजय मेंढे, किसान मोर्चाचे रोहित चिवटे, धनंजय कुलकर्णी, सुनील पाटील, प्रणव पटवर्धन उपस्थित होते.
फाेटाे : ०८ मिरज ३