शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेष्ठींनी समज दिली, नाईकांची नाराजी मिटली; नरेश म्हस्केंचा अर्ज भरायला 'ते' सगळे येणार
2
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
3
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
4
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
5
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
6
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
7
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
8
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
9
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
10
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
11
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
12
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
13
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
14
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
15
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
16
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
17
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
18
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
19
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
20
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा

सावळजच्या बाळू लोखंडेंची लोखंडी खुर्ची सातासमुद्रापार, व्हिडीओ व्हायरल 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2021 5:59 PM

Sangali : सामान्य कुटुंबातील बाळू लोखंडे यांनी १५ वर्षापूर्वी स्वत:चा मंडप उभारणी व सजावटीचा व्यवसाय सुरू केला होता. अनेक कार्यक्रमांत जेवणासाठी टेबल व खुर्चीची मागणी व्हायला लागली.

तासगाव (जि. सांगली) : सावळज (ता. तासगाव) येथील मंडप व्यावसायिक बाळू लोखंडे यांच्या लोखंडी खुर्चीची चर्चा सातासमुद्रापार व्हायरल झाली आहे. याला निमित्त ठरले आहे, ते जेष्ठ क्रीडा समीक्षक सुनंदन लेले यांनी सोशल मीडियावर शेअर केलेला व्हिडिओ.लंडनच्या मँचेस्टरमधील अल्ट्रिक्म भागात फिरत असताना त्यांना एका रेस्टाॅरंटच्या परिसरात एक लोखंडी खुर्ची दिसली.

या खुर्चीच्या मागे ‘बाळू लोखंडे, सावळज’ असे नाव लिहिले आहे. लेले यांनी त्याच लोखंडी खुर्चीचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला. काही तासातच व्हीडीओ तुफान व्हायरल झाला आणि एकच चर्चा सुरू झाली. सावळज येथील मंडप व्यावसायिक बाळू लोखंडेंची लोखंडी खुर्ची तब्बल ७ हजार ६२७ किलोमीटरचा प्रवास करून इंग्लंडमधील मँचेस्टरच्या हाॅटेलात कशी पोहोचली, याबाबत नेटकऱ्यांनी अनेक विनोदी तर्कवितर्क लढवायला सुरुवात केली आहे.

सामान्य कुटुंबातील बाळू लोखंडे यांनी १५ वर्षापूर्वी स्वत:चा मंडप उभारणी व सजावटीचा व्यवसाय सुरू केला होता. अनेक कार्यक्रमांत जेवणासाठी टेबल व खुर्चीची मागणी व्हायला लागली. मंडप व्यवसायास जोडधंदा म्हणून केटरिंगचे साहित्यही आणले. त्यामध्ये लोखंडी खुर्च्या होत्या. या खुर्च्या त्यांनी १५ वर्षापूर्वी हुबळी (कर्नाटक) येथून घेतल्या होत्या. एका खुर्चीचे वजन १३ किलो होते. वजनाने जड लोखंडी खुर्च्या नंतर हाताळण्यासही जड वाटू लागल्या.

काळाच्या ओघात ग्राहकही फ्लॅस्टिक खुर्च्यांची मागणी करू लागले होते. यामुळे काही वर्षापूर्वी त्यांनी लोखंडी खुर्च्या कवठेमहांकाळ (जि. सांगली) येथे भंगारात १० रुपये किलो दराने विकून टाकल्या. काही खुर्च्या आजही आठवण म्हणून जपून ठेवल्या आहेत. भंगारात विकलेल्या या खुर्च्या पुढे मुंबईपर्यंत गेल्या. नंतर एका परदेशी व्यावसायिकाने दुर्मिळ खुर्च्या म्हणून त्या विकत घेतल्या. पूर्वीच्या काळातील लोखंड मजबूत असल्यामुळे यापैकी काही खुर्च्या मॅंचेस्टरच्या रेस्टॉरंट मालकाने विकत घेतल्या. त्याच खुर्च्या ग्राहकांना बसायला ठेवल्या आहेत.

सुनंदन लेलेंचा लंडनमधूनच बाळू लोखंडेंना फोनबाळू लोखंडेंची लोखंडी खुर्ची लंडनमध्ये पाहिल्यानंतर सुनंदन लेलेंनी थेट बाळू लोखंडेंना फोन केला. मँचेस्टरच्या मार्केटमध्ये एका मराठी माणसाचे नाव पाहून मी भारावून गेलो, म्हणून हा व्हिडीओ पोस्ट केला. व्हिडोओ पोस्ट केल्यानंतर राज्यमंत्री विश्वजित कदम, पानी फाऊंडेशनचे डॉ. अविनाश पोळ यांनी माझ्याशी संपर्क केला, असे लेले यांनी फोनवरून सांगितले. लंडनहून भारतात परत आल्यानंतर सावळजला भेट घ्यायला येणार असल्याचे लेलेंनी सांगितले.

टॅग्स :Sangliसांगली