बळीराजा पावसाच्या प्रतीक्षेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:33 IST2021-07-07T04:33:59+5:302021-07-07T04:33:59+5:30
वाळवा : पावसाळ्याच्या प्रारंभाला सुरुवात झाली व सर्वत्र पावसाने जोरदार हजेरी लावली. समाधानकारक पाऊस पडला आणि एक फुटापर्यंत जमिनीत ...

बळीराजा पावसाच्या प्रतीक्षेत
वाळवा : पावसाळ्याच्या प्रारंभाला सुरुवात झाली व सर्वत्र पावसाने जोरदार हजेरी लावली. समाधानकारक पाऊस पडला आणि एक फुटापर्यंत जमिनीत ओल झाल्याने बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांनी खरिपाच्या पेरण्या किंवा टोकणी केल्या आहेत;परंतु गेल्या पंधरा दिवसांत पावसाने पूर्ण उघडीप दिली आहे, त्यामुळे बळीराजा पावसाच्या प्रतीक्षेने चिंतातुर झाला आहे.
वाळवा बावच रस्ता, कामेरी, इस्लामपूर रस्ता, पांढरभाग परिसर, साखराळे व खेड रस्ता परिसरात, अहिरवाडी, पडवळवाडी येथे अनेक शेतकऱ्यांनी खरिपाच्या पेरण्या किंवा टोकणी केल्या आहेत. यावेळी मे महिन्यात रोहिणी नक्षत्राचा पाऊस, तसेच जूनमध्ये पहिल्या आठवड्यात विपुल प्रमाणात पाऊस झाला. पूर येण्याची परिस्थिती निर्माण झाली होती; परंतु जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यात पावसाने जी उघडीप दिली ती आजही उघडीप आहे. त्यामुळे पिके दुपार धरून माना टाकू लागले आहेत. जिथे उपसा जलसिंचन योजनाद्वारे पाणी देता येईल तिथे भुईपाटाने पाणी देऊन पिके वाचवली जात आहेत, परंतु जिथे पाणी देण्याची सोय नाही, तिथे बळीराजा पावसाच्या प्रतीक्षेत डोळे लावून बसला आहे.