बालाजी चौकात खड्ड्यात टेम्पो रुतला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:32 IST2021-09-14T04:32:11+5:302021-09-14T04:32:11+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : शहरातील बालाजी चौकात ड्रेनेजसाठी रस्त्याची खुदाई करण्यात आली होती. काही दिवसांपूर्वीच महापालिकेने मुरूम टाकून ...

In Balaji Chowk, the tempo was broken | बालाजी चौकात खड्ड्यात टेम्पो रुतला

बालाजी चौकात खड्ड्यात टेम्पो रुतला

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : शहरातील बालाजी चौकात ड्रेनेजसाठी रस्त्याची खुदाई करण्यात आली होती. काही दिवसांपूर्वीच महापालिकेने मुरूम टाकून चर मुजविली होती. पण सोमवारी पावसामुळे या चरीत गाडी रुतली. या प्रकाराची दखल घेत उपमहापौर उमेश पाटील यांनी बांधकाम अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेत तत्काळ चर दुरुस्तीचे आदेश दिले.

बालाजी चौक ते हरभटरोड, गणपती पेठ या रस्त्यावर महिन्याभरापूर्वी ड्रेनेजची नवीन पाइपलाइन टाकण्यात आली. त्यानंतर ही चर तशीच होती. मुख्य बाजारपेठेत चरीमुळे वाहतुकीची कोंडी होत होती. याबाबत नागरिक, व्यापाऱ्यांनी महापालिकेकडे तक्रार केली. पालिकेच्या बांधकाम विभागाने चार दिवसांपूर्वी मुरूम टाकून चर मुजविली.

गेल्या दोन दिवस झालेल्या पावसामुळे मुरूम खाली गेला. त्यात सोमवारी एक टेम्पो या चरीत अडकून पडला. एका नागरिकाने या चरीतच प्रतीकात्मक वृक्षारोपणही केले. हा प्रकार समजताच उपमहापौर पाटील यांनी शाखा अभियंता आप्पा हलकुडे यांना दूरध्वनी करून झाडाझडती घेतली. चरी मुजविताना केवळ मुरूम टाकण्यात आला होता. खडीचा वापर केलेला नव्हता. त्यामुळे रस्ता खचला आहे. तातडीने ही चर मुजवून घ्या. मंगळवारपासून गणेश विसर्जनाला सुरुवात होईल. या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात लोक विसर्जनासाठी येतात. त्यांना कसलाही अडथळा होऊ नये, असे आदेशही दिले.

Web Title: In Balaji Chowk, the tempo was broken

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.