शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

Sangli Crime: पेन्शन मंजूर करून देण्याचे आमिष; महाडिकवाडीत वृद्ध महिलेची २० लाखांची फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2025 18:03 IST

पाचजणांविरुद्ध गुन्हा दाखल

जत : येथील महाडिकवाडी (शेगाव, ता. जत) येथील वृद्ध महिलेला संजय गांधी निराधार योजनेची पेन्शन योजना मंजूर करून देण्याचे आमिष दाखवून तब्बल २० लाखांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. खरेदीचा बनावट दस्त करून पाचजणांनी जमीन विक्री करून पैसे वाटून घेतल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. श्रीमती आक्काताई श्रीमंत महाडिक (वय ७७, रा महाडिकवाडी, शेगाव) असे फसवणूक झालेल्या वृद्धेचे नाव आहे.याप्रकरणी अनिल रावसाहेब नलवडे, जालिंदर बापू नलवडे, सागर जालिंदर नलवडे,अविनाश सोपान महाडिक, अतुल सोपान महाडिक (सर्व रा. महाडिकवाडी, शेगाव) या पाच संशयित आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २ जुलै २०२५ रोजी सकाळी ११ वाजता ते ३ जुलै २०२५ रोजी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या घटनेचा अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक चंद्रकांत जाधव करत आहेत.

बनावट दस्त करुन जमीनीची विक्रीमहाडिकवाडी शेगाव येथील वृद्ध आक्काताई महाडिक या आजारी असल्याचा फायदा घेत अनिल नलवडे,जालिंदर नलवडे, सागर नलवडे,अविनाश महाडिक, अतुल महाडिक या पाचजणांनी “संजय गांधी पेन्शन योजना मंजूर करून देतो” असे सांगून विश्वासात घेतले. यानंतर दुय्यम निबंधक कार्यालयात अंगठा घेऊन खरेदीचा बनावट दस्त करून घेतला. जमीन विक्रीतून मिळालेली २० लाखांची रक्कम परस्पर वाटून घेत फिर्यादीची सरळसरळ फसवणूक केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Sangli: Elderly Woman Duped of ₹20 Lakhs with Pension Promise

Web Summary : In Sangli, a 77-year-old woman was defrauded of ₹20 lakhs after being lured with promises of pension benefits. Five individuals allegedly created a false land sale deed, pocketing the money. Police are investigating the fraudulent act.