पिशव्यांमुळे जनावरांचे आरोग्य धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:18 IST2021-06-11T04:18:03+5:302021-06-11T04:18:03+5:30
---------------- खुल्या जागांची दैन्यावस्था कायम सांगली : शहरात अनेक खुल्या जागा आहेत. मात्र काही मोजक्याच जागांना संरक्षण भिंत उभारण्यात ...

पिशव्यांमुळे जनावरांचे आरोग्य धोक्यात
----------------
खुल्या जागांची दैन्यावस्था कायम
सांगली : शहरात अनेक खुल्या जागा आहेत. मात्र काही मोजक्याच जागांना संरक्षण भिंत उभारण्यात आली आहे. अनेक ठिकाणच्या खुल्या जागांना संरक्षण भिंत नाही. तसेच या ठिकाणी कचऱ्याचे साम्राज्य दिसून येते.
------------------
रस्त्यालगत वाहनांवर कारवाई करा
मिरज : शहरातील काही चौकात अगदी रस्त्यावर दुचाकी व चारचाकी वाहने पार्क केली जातात. या वाहनांवर कारवाई होत नसल्याने वाहने रस्त्यावर लावण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. वाहनांवर कारवाई करण्याची मागणी आहे.
---------
पालकांमध्ये चिंता
सांगली : कोरोनामुळे गत वर्षी शाळा भरु शकल्या नाहीत. मुलांना ऑनलाईनच अभ्यास करावा लागला. याचा मुलांसह पालकांनाही काही काळ त्रास झाला. यंदाही अजून कोरोनाचा धोका असल्याने शाळा सुरु करण्याचा निर्णय झाला नाही. यामुळे पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
-------------------