इस्लामपुरात उद्यापासून बॅडमिंटन स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 04:47 IST2021-02-18T04:47:00+5:302021-02-18T04:47:00+5:30

इस्लामपूर : जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त वाळवा तालुका शटल बॅडमिंटन असोसिएशन इस्लामपूर यांच्यावतीने दि. १९ ते २१ फेब्रुवारी २०२१ ...

Badminton tournament from tomorrow in Islampur | इस्लामपुरात उद्यापासून बॅडमिंटन स्पर्धा

इस्लामपुरात उद्यापासून बॅडमिंटन स्पर्धा

इस्लामपूर : जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त वाळवा तालुका शटल बॅडमिंटन असोसिएशन इस्लामपूर यांच्यावतीने दि. १९ ते २१ फेब्रुवारी २०२१ अखेर राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन केल्याची माहिती बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष संग्रामसिंह पाटील यांनी दिली.

या स्पर्धा ३ दिवस चालणार आहेत. यामध्ये राज्यातील खेळाडू, संघ सहभागी होणार आहेत. विजेत्या खेळाडूंना रोख रक्कम, चषक, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. स्पर्धा राजारामबापू पाटील इनडोअर स्टेडियम राजारामनगर येथे असून या स्पर्धा महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशन यांच्या मार्गदर्शनाखाली खेळवल्या जाणार आहेत. स्पर्धा १३, १५, १७ वर्षे मुले / मुलींसाठी एकेरी व दुहेरी, तर खुल्या गटासाठी, ३५/४५ वर्षावरील गट दुहेरी अशा होत आहेत.

सहभागी होण्यासाठी सचिन भिलारे, अभिषेक जाधव यांच्याशी संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले. यावेळी सेक्रेटरी सचिन भिलारे, डॉ. जावेद मगदूम, अ‍ॅड. अभिजित परमणे, प्रा. नितीन शिंदे, महादेव सूर्यवंशी, प्रकाश वडार, राजेंद्र घोरपडे उपस्थित होते.

Web Title: Badminton tournament from tomorrow in Islampur