ग्राहकांचे वीज कनेक्शन तोडल्यास वाईट परिणाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:49 IST2021-02-06T04:49:43+5:302021-02-06T04:49:43+5:30
शिराळा : महावितरण कंपनीने ग्राहकांच्या वीज कनेक्शनला हात घातल्यास त्याच्या वाईट परिणामांना सामोरे जावे लागेल. तसेच वीज कंपनीने ...

ग्राहकांचे वीज कनेक्शन तोडल्यास वाईट परिणाम
शिराळा : महावितरण कंपनीने ग्राहकांच्या वीज कनेक्शनला हात घातल्यास त्याच्या वाईट परिणामांना सामोरे जावे लागेल. तसेच वीज कंपनीने आपला कारभार सुधारावा अन्यथा वठणीवर आणावे लागेल, असा गंभीर इशारा माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक यांनी दिला.
शिराळा येथे भाजपच्या वतीने वाढीव वीज बिलासंदर्भात वीज वितरण कार्यालयावर माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक व जिल्हा परिषद सदस्य संपतराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली ‘टाळे ठोक व हल्लाबोल आंदोलन’ करण्यात आले.
शिवाजीराव नाईक म्हणाले, ग्रामीण भागातील जनतेचा या महाआघाडी सरकारच्या कारभाराविरोधात तिरस्कार निर्माण झाला आहे. सामान्य जनता व शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचे काम ही मंडळी करत आहे. सरकारने लॉकडाऊनच्या काळात वीजमाफी देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु त्यांनी शब्द पाळलेला नाही. या लबाड सरकारला जनता कंटाळली आहे.
संपतराव देशमुख म्हणाले, महावितरण कंपनीने थकीत ग्राहकांना कनेक्शन तोडणीसाठी दिलेल्या नोटिसा हे अन्यायकारक आहे.
सुखदेव पाटील, हणमंतराव पाटील, प्रकाश पाटील, सम्राट शिंदे, आनंदराव पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.
या वेळी रणजीतसिह नाईक, महादेव कदम, के.डी. पाटील, सम्राटसिंह शिंदे, रघुनाथ पाटील, प्रकाश पाटील, पंचायत समिती सदस्या सारिका पाटील, राजेश्री यादव, वैभव गायकवाड, बी.जी. पाटील आदीसह शेतकरी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फोटो-०५शिराळा१
फोटो ओळ :- शिराळा येथे भाजपच्या वतीने वाढीव बिलासंदर्भात मागण्यांचे निवेदन माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिले. या वेळी संपतराव देशमुख, सुखदेव पाटील, महादेव कदम आदी उपस्थित होते.