टक्केवारीच्या महापुरात विद्यार्थ्यांची आयटीआय प्रवेशाकडे पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:30 IST2021-08-25T04:30:55+5:302021-08-25T04:30:55+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : अैाद्योगिक प्रशिक्षण संस्थेत (आयटीआय)मध्ये प्रवेशासाठी विद्यार्थ्यांचा प्रतिसाद पुरेसा नाही. अर्ज नोंदणी कमी झाल्याने यंदा ...

Back to ITI admission of students in the flood of percentages | टक्केवारीच्या महापुरात विद्यार्थ्यांची आयटीआय प्रवेशाकडे पाठ

टक्केवारीच्या महापुरात विद्यार्थ्यांची आयटीआय प्रवेशाकडे पाठ

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : अैाद्योगिक प्रशिक्षण संस्थेत (आयटीआय)मध्ये प्रवेशासाठी विद्यार्थ्यांचा प्रतिसाद पुरेसा नाही. अर्ज नोंदणी कमी झाल्याने यंदा प्रवेश प्रोत्साहन अभियान राबविण्याची वेळ आली आहे.

कोरोनामुळे दहावीची प्रत्यक्ष परीक्षा न होताच विद्यार्थी उत्तीर्ण झाले. मूल्यांकनाच्या पॅटर्नमुळे अनेकांना क्षमता आणि अपेक्षा नसतानाही ८० ते ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळाले. चांगल्या गुणांमुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. त्यांचे लक्ष आता डिप्लोमा, सायन्स किंवा अन्य चांगल्या शिक्षणक्रमांकडे आहे. त्याचा फटका आयटीआय प्रवेशाला बसला आहे.

बॉक्स

गतवर्षीपेक्षा प्रतिसाद कमी

१. आयटीआय प्रवेशाला विद्यार्थ्यांचा प्रतिसाद गेल्यावर्षीपेक्षा कमी असल्याने शिक्षणतज्ज्ञही चकीत झाले आहेत.

२. राज्यभरात गेल्या आठवड्यापर्यंत फक्त ४ हजार ७०० विद्यार्थ्यांनी पैसे भरून प्रवेश निश्चित केले आहेत.

३. प्रवेशासाठी ३१ ऑगस्टपर्यंत अंतिम मुदत असल्याने संख्या वाढण्याची अपेक्षा आहे.

४. प्रवेशवाढीसाठी कॅम्पेन, जाहिरातबाजी, व्हॉटस् ॲप ग्रुपद्वारे विद्यार्थ्यांशी संपर्क असे प्रयत्न प्रशासन करत आहे.

कोट

चांगले गुण मिळाल्याने वेगळा विचार

दहावीला ८० टक्क्यांवर गुण मिळाल्याने डिप्लोमा किंवा सायन्सला प्रवेश घेणार आहे. दहावीला इतके गुण मिळतील असा अंदाज नव्हता, त्यामुळे पहिल्या टप्प्यात ‘आयटीआय’चाच विचार केला होता.

- मयूर कवाळे, विद्यार्थी

आयटीआय प्रवेशासाठी ऑनलाईन नोंदणी केली आहे, पण प्रवेश घेईनच याची निश्चिती नाही. पालकांचा आग्रह अभियांत्रिकीसाठी आहे, त्याचाही विचार करावा लागेल. माझी पसंती आयटीआयसाठीच आहे.

- साकेत रणवरे, विद्यार्थी

१०० टक्के जागा भरतील

आयटीआय प्रवेशासाठी गतवर्षीपेक्षा विद्यार्थ्यांचा प्रतिसाद कमी आहे. तो वाढविण्यासाठी वेगवेगळ्या मार्गांनी प्रयत्न सुरू आहेत. राज्यभरातच असा संथ प्रतिसाद आहे. प्रवेशासाठी ३१ ऑगस्टपर्यंत अंतिम मुदत आहे, तोपर्यंत प्रवेश वाढण्याची अपेक्षा आहे. दहावीचा निकाल अत्यंत चांगला लागल्याने ‘आयटीआय’च्या सर्व जागा १०० टक्के भरतील याची खात्री आहे.

- प्राचार्य यतीन पारगावकर, शासकीय अैाद्योगिक संस्था, सांगली

पॉईंटर्स

जिल्ह्यातील एकूण जागा ३७६८

आलेले अर्ज २५५०

जिल्ह्यात आयटीआय

शासकीय १०

खासगी १४

प्रवेश क्षमता

शासकीय २६००

खासगी ११६८

Web Title: Back to ITI admission of students in the flood of percentages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.