आष्ट्यात कोरोनाबाबत जनजागृती रांगोळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:19 IST2021-06-11T04:19:16+5:302021-06-11T04:19:16+5:30
आष्टा येथील विश्रांती कोळी या महाविद्यालयीन युवतीने कोरोनाविषयक जनजागृती करण्यासाठी रेखाटलेली रांगोळी. फोटो १००६२०२१-आयएसएलएम-आष्टा रांगोळी १ विश्रांती कोळी हिच्या ...

आष्ट्यात कोरोनाबाबत जनजागृती रांगोळी
आष्टा येथील विश्रांती कोळी या महाविद्यालयीन युवतीने कोरोनाविषयक जनजागृती करण्यासाठी रेखाटलेली रांगोळी.
फोटो १००६२०२१-आयएसएलएम-आष्टा रांगोळी १
विश्रांती कोळी हिच्या उपक्रमाचे माजी उपनगराध्यक्षा तेजश्री बोंडे व डॉ. प्रकाश आडमुठे,अतुल महाजन यांनी कौतुक केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टा : येथील मिरज वेस कोळी गल्लीतील विश्रांती कोळी या महाविद्यालयीन युवतीने दारात कोरोना विषयक रांगोळी काढून जनजागृती केली. विश्रांती कोळी व तिच्या महाविद्यालयांतील सहकाऱ्यांनी परिसरातील गावागावांत कोरोनाविषयक जनजागृती अभियान सुरू केले आहे. या अभियानाअंतर्गत विश्रांती कोळी हिने घरासमोर कोरोनाविषयक जनजागृती करणारी रांगोळी साकारली. रांगोळीच्या माध्यमातून 'घरी रहा सुरक्षित रहा’ मास्क सॅनिटायझर वापरा, वाफ घ्या,माझा गाव कोरोना मुक्त गावचा संदेश दिला. तिच्या या उपक्रमाचे माजी उपनगराध्यक्ष तेजश्री बोंडे, आष्टा डॉक्टर्स असोसिएशनचे माजी अध्यक्ष प्रकाश आडमुठे, अतुल महाजन व श्री चॅरिटेबल ट्रस्टच्या सदस्यांनी कौतुक करून तिला प्रोत्साहन दिले.