लोकमत ‘रक्तदान महायज्ञ’ उपक्रमाची महाराष्ट्रभर जनजागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:34 IST2021-07-07T04:34:02+5:302021-07-07T04:34:02+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क इस्लामपूर : जालना येथील एसआरएजे उद्योग समूहातर्फे श्री ओम स्टीलच्या ‘स्टील ऑन व्हील’ या ब्रँडिंग व्हॅनच्या ...

लोकमत ‘रक्तदान महायज्ञ’ उपक्रमाची महाराष्ट्रभर जनजागृती
लाेकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : जालना येथील एसआरएजे उद्योग समूहातर्फे श्री ओम स्टीलच्या ‘स्टील ऑन व्हील’ या ब्रँडिंग व्हॅनच्या माध्यमातून लोकमत ‘रक्तदान महायज्ञ’ उपक्रमाची महाराष्ट्रभर जनजागृती करण्यात येणार आहे. ‘लोकमत’च्या या महायज्ञात सहभागी असल्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे, असे प्रतिपादन श्री ओम स्टीलचे व्यवस्थापकीय संचालक सुरेंद्र पित्ती यांनी केले.
सुरेंद्र पित्ती म्हणाले, ‘लोकमत’ नेहमीच समाजोपयोगी कार्यक्रमात अग्रेसर राहिला आहे. ‘लाेकमत’तर्फे ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी जवाहरलालजी दर्डा यांच्या जयंतीनिमित्त आयाेजित राज्यस्तरीय ‘रक्तदान महायज्ञ’ उपक्रम स्तुत्य आहे. त्यास साथ देत श्री ओम स्टील आपल्या ‘स्टील ऑन व्हील’ या ब्रँडिंग व्हॅनच्या माध्यमातून १५ जुलैपर्यंत महाराष्ट्रभर या मोहिमेबाबत जनजागृती करणार आहे. या ‘स्टील ऑन व्हील’ व्हॅनच्या माध्यमातून स्टीलचे उत्पादन कसे होतेे, त्यासाठी वापरात येणारे तंत्रज्ञान, गुणवत्ता आणि टिकाऊपणा याची माहिती दिली जाते. कोणत्या बांधकामाला कोणते स्टील किती प्रमाणात वापरावे, याचीही माहिती दिली जाते.