शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
2
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
3
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
4
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
5
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
6
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
7
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
8
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
9
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
10
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
11
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
12
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
13
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
14
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
15
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

पत्रकारिता व समाजातील विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्यांना पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2020 11:45 IST

जनतेच्या मनात प्रशासनाबद्दल विश्वास निर्माण करण्यासाठी सदैव प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री जयंत पाटील यांनी केले. यावेळी पत्रकारिता व समाजातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना जयंत पाटील आणि अभिनेते स्वप्नील जोशी यांच्याहस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.

ठळक मुद्देपत्रकारिता व समाजातील विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्यांना पुरस्कार  प्रशासनाबद्दल विश्वास निर्माण करण्यासाठी सदैव प्रयत्नशील:  जयंत पाटील

सांगली : प्रशासनाच्या माध्यमातून जनतेला उत्तम सेवा मिळाली पाहिजे यासाठी आग्रही असून जनतेच्या मनात प्रशासनाबद्दल विश्वास निर्माण करण्यासाठी सदैव प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री जयंत पाटील यांनी केले. यावेळी त्यांनी जनतेचा समाधानाचा निर्देशांक वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि महानगरपालिका प्रशासन काम करतील असा विश्वास व्यक्त केला.पत्रकार भवन येथे सांगली जिल्हा मराठी पत्रकार संघटना यांच्यावतीने पत्रकारिता व समाजातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना जलसंपदा मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील आणि सुप्रसिध्द अभिनेते स्वप्नील जोशी यांच्याहस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे राजाध्यक्ष संजय भोकरे होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस यांच्यासह विविध पत्रकार संघटनांचे पदाधिकारी, सदस्य, प्रसार माध्यमांमधील मान्यवर यांची प्रमुख उपस्थिती होती.

पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, पत्रकारांबरोबर आपले नेहमीच जिव्हाळ्याचे संबंध राहिले असून आपल्या यशस्वी वाटचालीत पत्रकारांची मोलाची साथ लाभली आहे. एकवेळ वर्तमानपत्र हाच माहितीचा प्रमुख स्त्रोत होता. त्यावर मोठ्या प्रमाणावर जनमत अवलंबून असायचे. आता माध्यमे अत्यंत गतीमान झाली असून बातमी व माहितीचा प्रचंड ओघ अतिप्रचंड वेगाने लोकांपर्यंत पोहोचतो आहे.

गुणवत्तापूर्ण माहिती समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रसार माध्यमांमधून होत असलेले प्रयत्न कौतुकास्पद आहेत. यावेळी त्यांनी पत्रकारांसाठी आवश्यक सुविधांबाबत सकारात्मक राहू असे सांगून सांगली, मिरज, कुपवाड महानगरपालिकेतील नागरिकांसाठी वैविध्यपूर्ण उपक्रम राबविण्याची ग्वाही दिली.उत्कृष्ट प्रशासकीय सेवेबद्दल जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांना गौरविण्यात आले. यावेळी सत्काराला उत्तर देताना ते म्हणाले, महापूर, निवडणूक, अतिवृष्टी या सर्व कामांमध्ये प्रशासनातील अधिकाऱ्यांनी अतिशय चांगले काम केले आहे. याचे प्रतिक म्हणून सांगली जिल्हा पत्रकार संघटनेच्या वतीने हा पुरस्कार मिळाला आहे. या पुरस्काराने लोकाभिमुख प्रशासनासाठी आणखी जबाबदारी वाढली आहे.उत्कृष्ट सांस्कृतिक सेवेबद्दल सुप्रसिध्द अभिनेते स्वप्निल जोशी यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यावेळी सत्काराला उत्तर देताना पत्रकार आणि कलाकार यांचे नाते अत्यंत घनिष्ट असल्याचे सांगून सांगलीच्या साहित्यिक व सांस्कृतिक भूमीत पत्रकारांनी दिलेला हा पुरस्कार असल्याने याचे महत्त्व फार मोठे आहे असे अधोरेखित केले.या कार्यक्रमास संजय भोकरे यांनी पत्रकारांसाठी सुविधा लक्षात घेऊन मुंबई प्रेस क्लबच्या धर्तीवर सांगली येथेही प्रेस क्लब व्हावा अशी मागणी केली.

यावेळी पालकमंत्री जयंत पाटील यांच्याहस्ते उत्कृष्ट पत्रकारितेसाठी दैनिक सकाळचे घनशाम नवाथे, उत्कृष्ट ग्रामीण पत्रकारिता पुरस्कार दत्ता पाटील (दै. लोकमत, तासगाव), प्रताप मेटकरी (दै. जनप्रवास विटा), उत्कृष्ट प्रशासकीय सेवा विशेष पुरस्कार उपायुक्त स्मृती पाटील, उत्कृष्ट निवेदिता इलेक्ट्रॉनिक मिडीया पत्रकार पुरस्कार रेश्मा साळुंखे (न्यूज 18 मुंबई लोकमत), उत्कृष्ट वैद्यकीय सेवा पुरस्कार डॉ. सुबोध उगाणे, डॉ. राजीव भडभडे, उत्कृष्ट उद्योजकता सेवा पुरस्कार रविंद्र नंदकुमार अथणे (रविंद्र वस्त्रनिकेतन सलगरे), उत्कृष्ट सामाजिक सेवा पुरस्कार वृषाली वाघचौरे यांना प्रदान करण्यात आला.यावेळी विविध क्षेत्रामध्ये विशेष कामगिरी करणाऱ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यामध्ये महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस यांच्यासह अन्य मान्यवरांचा समावेश होता. 

टॅग्स :reporterवार्ताहरJayant Patilजयंत पाटीलSangliसांगलीSwapnil Joshiस्वप्निल जोशी