संभाजी ब्रिगेडतर्फे कर्तबगार व्यक्तींना पुरस्कार प्रदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 04:21 IST2021-01-15T04:21:56+5:302021-01-15T04:21:56+5:30

सांगली : संभाजी ब्रिगेडतर्फे विविध क्षेत्रातील कर्तबगार व्यक्तींना पुरस्कारांनी गौरविण्यात आले. जिजाऊ जयंतीनिमित्त मराठा सेवा संघात हा कार्यक्रम झाला. ...

Awarded by Sambhaji Brigade to deserving persons | संभाजी ब्रिगेडतर्फे कर्तबगार व्यक्तींना पुरस्कार प्रदान

संभाजी ब्रिगेडतर्फे कर्तबगार व्यक्तींना पुरस्कार प्रदान

सांगली : संभाजी ब्रिगेडतर्फे विविध क्षेत्रातील कर्तबगार व्यक्तींना पुरस्कारांनी गौरविण्यात आले. जिजाऊ जयंतीनिमित्त मराठा सेवा संघात हा कार्यक्रम झाला.

पुरस्कार असे : सुमन पाटील (पलूस ) - आदर्श माता, मारुती शिंदे (पाटगाव) - छत्रपती संभाजी महाराज युवा पुरस्कार, विनायक कदम (तासगाव ) व उदयसिंह रजपूत - तानुबाई बिर्जे उत्कृष्ट पत्रकार, सचिन पाटील (कर्नाळ) - राष्ट्रसंत जगद्गुरू तुकोबाराय साहित्यिक पुरस्कार, सर्जेराव नरुटे (सोनी) - विठ्ठलराव विखे पाटील कृषी पुरस्कार, संताजी पाटील - उत्कृष्ट उद्योजक, अंजु विभुते (वाळवा) - हिरकणी, कल्पना माळी (सांगली)- संगीतसूर्य केशवराव भोसले उत्कृष्ट शाहीर, वंदना शहाणे (सांगली) - डॉ. राखमाबाई राऊत कोरोना योद्धा.

प्रमुख पाहुणे म्हणून जिजाऊ ब्रिगेडच्या अध्यक्षा डॉ. निर्मला पाटील, मराठा उद्योग कक्षाचे प्रदेशाध्यक्ष राजेंद्रसिंह पाटील यांनी मार्गदर्शन केले. यावेळी किरण पाटील, चंद्रकांत पाटील, सुधीर पाटील, जिजाऊ ब्रिगेडच्या अध्यक्षा शीतल मोरे, बन्सीलाल कदम, हेमलता देसाई, संजय देसाई, ऋतुराज पवार, अमोल कदम, जयश्री घोरपडे, शिवाजी जाधव, राजू जाधव, रशीद शेख, फैयाज सतारमेकर, संतोष जाधव, संदीप पवार, नंदकुमार बागडे, मुन्ना मुल्ला, पोपट खरात, असिफ भोकरे, मोहन खताळ, मीनाक्षी शिंदे आदी उपस्थित होते.

शाहीर देवानंद माळी यांनी प्रारंभी पोवाडा सादर केला. ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी स्वागत केले. अर्चना कदम यांनी सूत्रसंचालन केले.

------

Web Title: Awarded by Sambhaji Brigade to deserving persons