हवालदार योगेश जाधव यांना पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 04:24 IST2021-01-21T04:24:36+5:302021-01-21T04:24:36+5:30
आष्टा : आष्टा पोलीस ठाण्यातील हवालदार योगेश बळवंत जाधव यांना इस्लामपूर उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णात पिंगळे यांच्या हस्ते ‘एम्प्लॉयी ...

हवालदार योगेश जाधव यांना पुरस्कार
आष्टा : आष्टा पोलीस ठाण्यातील हवालदार योगेश बळवंत जाधव यांना इस्लामपूर उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णात पिंगळे यांच्या हस्ते ‘एम्प्लॉयी ऑफ द मंथ’ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
विविध पोलीस ठाण्यांमधील कर्मचाऱ्यांनी केलेल्या उत्कृष्ट कामाबद्दल त्यांचा गौरव करण्यात येत आहे. प्रत्येक पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांकडून सर्वोत्कृष्ट कर्मचाऱ्यांना प्रत्येक महिन्यात पुरस्कार, रोख रक्कम व प्रमाणपत्र देण्यात येते. यामुळे कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन मिळून आणखी चांगले काम करण्याची प्रेरणा मिळत आहे. जाधव यांना उपविभागीय पिंगळे व पोलीस निरीक्षक भानुदास निंभोरे यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
फोटो : आष्टा पोलीस ठाणे येथील हवालदार योगेश जाधव यांना 'एम्प्लॉयी ऑफ द मंथ' पुरस्कार देऊन गौरव करताना उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णात पिंगळे. सोबत पोलीस निरीक्षक भानुदास निंभोरे.