वसंतरावदादा पाटील महाविद्यालयात लोकसंस्कृतीचा जागर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:30 IST2021-02-05T07:30:42+5:302021-02-05T07:30:42+5:30
या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून प्रा. डॉ. रघुनाथ केंगार यांची निवड झाली आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष ...

वसंतरावदादा पाटील महाविद्यालयात लोकसंस्कृतीचा जागर
या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून प्रा. डॉ. रघुनाथ केंगार यांची निवड झाली आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांच्या हस्ते होणार आहे. तर समारोप स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे आजीव सेवक आणि सांगली जिल्हाप्रमुख प्राचार्य व्ही. एस. पाटील यांच्या उपस्थितीत होणार आहे. या चर्चासत्रात तज्ज्ञ मार्गदर्शक डॉ. नंदकुमार मोरे, स्नेहा महांब्ररे (गोवा), प्रा. डॉ. कृष्णा इंगोले (सांगोला). डॉ. उदय जाधव (सातारा) डॉ. नीला जोशी (कोल्हापूर) डॉ. शिवकुमार सोनाळकर, डॉ. प्रकाश दुकळे आदी मान्यवर चर्चा करणार आहेत. यावेळी लोकसंस्कृतीचा लोककलाप्रकारातून आविष्कार व सादरीकरण होणार आहे. यामध्ये छाया आगर नागजकर लोकनाट्य तमाशा मंडळ, शिवशंभो सोंगी व भारुड मंडळ ढवळी आणि संपत कदम आणि पार्टी तुंग हे कलावंत सहभागी होणार आहेत.
महाविद्यालयाच्या वतीने तासगाव पंचक्रोशीतील सर्व लोकसंस्कृतीचे अभ्यासक रसिक श्रोत्यांनी जास्तीत जास्त सहभाग घेऊन या कार्यक्रमांचा आस्वाद घ्यावा असे आवाहन संयोजन समिती प्रमुख व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मिलिंद हुजरे यांनी केले आहे.