कोरोना टाळण्यासाठी लॉकडाऊन नको, २४ तास ‘लॉक ओपन’ ठेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:24 IST2021-04-06T04:24:58+5:302021-04-06T04:24:58+5:30
सांगली : कोरोना रोखण्यासाठी लॉकडाऊन हा उपाय नसून, २४ तास ‘लॉक ओपन’ योजना राबवायला हवी, असा पर्याय व्यावसायिकांनी जिल्हाधिकाऱ्यांना ...

कोरोना टाळण्यासाठी लॉकडाऊन नको, २४ तास ‘लॉक ओपन’ ठेवा
सांगली : कोरोना रोखण्यासाठी लॉकडाऊन हा उपाय नसून, २४ तास ‘लॉक ओपन’ योजना राबवायला हवी, असा पर्याय व्यावसायिकांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे. दुकाने व बाजारपेठा २४ तास खुली राहिल्याने गर्दी होणार नाही, असा दावा केला आहे.
सामाजिक कार्यकर्ते जब्बार बारस्कर यांच्यासह श्रीकांत कोळेगिरी, राजेश शिंदे, सुलतान महंमद शेख, अन्वर काजी आदींनी निवेदन दिले. त्यांनी सांगितले की, बाजारपेठा सलग सुरू राहिल्यास सध्याची गर्दी विभाजित होईल, त्यामुळे कोरोनाचा संसर्ग फैलावणार नाही. व्यवसायदेखील थांबणार नाही. या उपायाची आठ दिवस अंमलबजावणी करावी आणि त्याचे परिणाम पाहून पुढील निर्णय घ्यावा. यानंतरही लॉकडाऊन करायचेच असेल तर, हातावर पोट असणाऱ्या गरजू कुटुंबांना अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करावा. तरुणांना बेरोजगार भत्ता द्यावा. लॉकडाऊन काळातील सर्व कर, पाणीपट्टी, वीजबिले माफ करावीत. कोरोनाबाधितांवर सर्व उपचार विनाशुल्क करावेत.