अविनाश पाटील यांची तासगाव नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड
By Admin | Updated: May 10, 2016 02:30 IST2016-05-10T02:04:57+5:302016-05-10T02:30:13+5:30
सोमवारी नगराध्यक्ष निवडीसाठी प्रांताधिकारी बोरकर यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा झाली.
अविनाश पाटील यांची तासगाव नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड
तासगाव : तासगाव नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदी भाजपचे अविनाश पाटील यांची बिनविरोध निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी आणि प्रांताधिकारी सुभाष बोरकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष सभेत ही निवड जाहीर करण्यात आली.
तत्कालीन नगराध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी खासदार संजयकाका पाटील यांच्या आदेशानुसार राजीनामा दिला होता. नव्या नगराध्यक्ष पदासाठी नगरसेवक अविनाश पाटील यांचे एकमेव नाव चर्चेत होते. खासदार संजयकाकांच्या आदेशानुसार नगराध्यक्ष पदासाठी पाटील यांचा एकमेव अर्ज दाखल झाला होता. सोमवारी नगराध्यक्ष निवडीसाठी प्रांताधिकारी बोरकर यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा झाली. यावेळी पाटील यांची नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले.
यावेळी मुख्याधिकारी अभिजित वायकोस, उपनगराध्यक्षा सारिका कांबळे, नगरसेवक अनिल कुत्ते, जाफर मुजावर, शरद मानकर, राजू म्हेत्रे, शैलेंद्र हिंगमिरे, बाबासाहेब पाटील, रजनीगंधा लंगडे, विजया जामदार, शुभांगी साळुंखे, सुशिला साळुंखे, शिल्पा धोत्रे, सिंधुताई वैद्य, जयश्री धाबुगडे उपस्थित होते. (प्रतिनिधी)