चिंचणी तलावाचा एक स्वयंचलित दरवाजा उघडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:19 IST2021-06-20T04:19:19+5:302021-06-20T04:19:19+5:30
चिंचणी (ता. कडेगाव) येथील तलाव तुडुंब भरला आहे. पाटबंधारे विभागाने मागील दोन दिवसांपूर्वी या तलावाचा एक आपत्कालीन दरवाजा उघडून ...

चिंचणी तलावाचा एक स्वयंचलित दरवाजा उघडला
चिंचणी (ता. कडेगाव) येथील तलाव तुडुंब भरला आहे. पाटबंधारे विभागाने मागील दोन दिवसांपूर्वी या तलावाचा एक आपत्कालीन दरवाजा उघडून पाण्याचा विसर्ग सुरू केला होता. परंतु विसर्ग होत असलेल्या पाण्यापेक्षा तलावात येणारे पाणी जास्त असल्याने या तलावाच्या सर्व ३१ स्वयंचलित दरवाजांवर पाण्याचा दाब वाढला आहे. यामुळे शनिवारी एक स्वयंचलित दरवाजा आपोआप उघडला आहे. दरवाजातून बाहेर पडलेल्या पाण्याने आसद पुलावर पाणी आले आहे. अजूनही काही दरवाजे उघडले तर सोनहिरा खोऱ्यात पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.
चिंचणी तलावाचे दोनपेक्षा जास्त स्वयंचलित दरवाजे उघडल्यास सोनहिरा खोऱ्यात पूरस्थिती निर्माण होते. हा दरवर्षीचा अनुभव आहे. चिंचणी तलावाच्या पाणलोट क्षेत्रात सोनसळ, शिरसगाव, सोनकीरे व चिंचणीच्या पश्चिम भागात जोरदार पर्जन्यवृष्टी होत आहे.त्यामुळे तलावात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक हाेत आहे. त्यामुळे शनिवारी या तलावाचा एक स्वयंचलित दरवाजा उघडला गेला.
यामुळे सोनहिरा ओढ्याला पूर आला आले. सध्या चिंचणी-आसद रस्त्याला असलेल्या आसद पुलावरून पाणी वाहत आहे. या पुलावरील वाहतूक पोलिसांनी बंद केली आहे. आणखी काही दरवाजे उघडल्यावर सोनहिरा खोऱ्यातील आसद, मोहित्यांचे वडगाव, अंबक, देवराष्ट्रे रस्त्यांवरच्या पुलावर पाणी येण्याची भीती आहे. त्यामुळे सोनहिरा काठच्या
नागरिकांनी व पुलावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांनी दक्षता घ्यावी. अशा सूचना पोलिसांनी दिल्या आहेत.
फोटो : १९ कडेगाव १
ओळ : चिंचणी (ता. कडेगाव) येथील तलावाचा एक़ स्वयंचलित दरवाजा शनिवारी उघडला गेला. यामुळे आसद पुलावरून पाणी वाहत आहे.