संखमध्ये जप्त वाळूचा आज लिलाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:26 IST2021-03-17T04:26:34+5:302021-03-17T04:26:34+5:30
संख : संख (ता. जत) येथे अप्पर तहसील कार्यालयात २५ ब्रास व उमदी पोलीस ठाण्याच्या आवारातील पाच ब्रास वाळूसाठा ...

संखमध्ये जप्त वाळूचा आज लिलाव
संख : संख (ता. जत) येथे अप्पर तहसील कार्यालयात २५ ब्रास व उमदी पोलीस ठाण्याच्या आवारातील पाच ब्रास वाळूसाठा असा एकूण ३० ब्रास वाळूसाठ्याचा जाहीर लिलाव दि. १७ मार्चला सकाळी ११ वाजता संख अप्पर तहसील कार्यालयात होणार आहे. बोली पद्धतीने हा लिलाव करण्यात येणार आहे, अशी माहिती प्रांताधिकारी प्रशांत आवटे यांनी मंगळवारी दिली.
जप्त केलेल्या वाळूसाठ्याचा लिलाव करण्यासाठी पाच हजार ७२९ रुपये प्रतिब्रासप्रमाणे मान्यता दिली आहे. लिलाव प्रक्रियेत भाग घेण्याकरिता मूळ किमतीच्या २० टक्के अनामत रक्कम ठेवावी लागणार आहे. उमदी पोलीस ठाण्याच्या आवारातील पाच ब्रास वाळूसाठा लिलावात भाग घेण्याकरिता पाच हजार ७२९ एवढ्या अनामत रकमेचा धनादेश लिलाव प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी जमा करावयाचा आहे.
लिलावामध्ये भाग घेणाऱ्या लिलावधारकांनी त्याच दिवशी शासकीय कोषागारात काही रक्कम जमा करायची आहे. उर्वरित रक्कम तीन दिवसांच्या आत भरण्याची आहे. लिलावधारकाने वाळू लिलावाच्या एकूण रकमेच्या १० टक्के जिल्हा गौण खनिज प्रतिष्ठान निधी, सांगली यांच्या खाती भरणे बंधनकारक आहे.