जयंत कबड्डी लीगसाठी आठ संघांची लिलाव प्रक्रिया उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:20 IST2021-02-05T07:20:07+5:302021-02-05T07:20:07+5:30
इस्लामपूर : राजारामनगर येथील जयंत स्पोर्ट्सने जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त दि. १६ ते २० फेब्रुवारी या कालावधीत जयंत ...

जयंत कबड्डी लीगसाठी आठ संघांची लिलाव प्रक्रिया उत्साहात
इस्लामपूर : राजारामनगर येथील जयंत स्पोर्ट्सने जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त दि. १६ ते २० फेब्रुवारी या कालावधीत जयंत कबड्डी प्रीमिअर लीगचे (जेकेपीएल) आयोजन केले आहे. या स्पर्धेत खेळणाऱ्या आठ संघांतील खेळाडूंची जयंत स्पोर्ट्सच्या मैदानावर मोठ्या उत्साहात लिलाव प्रक्रिया पार पडली.
या लीगचे मुख्य संयोजक, नगरसेवक खंडेराव जाधव म्हणाले, जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या वाढदिवसानिमित्त ही कबड्डी लीग आयोजित केली आहे. वाळवा तालुक्यातील ग्रामीण भागातील खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचा आमचा प्रयत्न आहे. तालुक्यातील १६ संघांतील ९६ खेळाडूंची निवड मैदान चाचणीतून केली आहे. त्यातील ६४ खेळाडूंची चिठ्ठीद्वारे आठ संघात विभागणी केली आहे. यानंतर प्रत्येक संघाने ४-४ खेळाडू थेट घेतले आहेत.
या लीगमध्ये खेळणारे संघ व त्यांचे प्रमुख- देवराज पाटील, कासेगाव- राजारामबापू ईगल्स, रणजित पाटील, कामेरी- स्व.जगदीश पाटील (आप्पा) रायडर्स, लिंबाजी पाटील, तांबवे - नरसिंह टायगर्स, शिवाजी पवार, इस्लामपूर - यशोधन चॅलेंजर्स, पृथ्वीराज पाटील, ओझर्डे- अदिती पँथर्स, रवींद्र पाटील, वाळवा- राजेंद्र पाटील, युवा मंच फायटर्स, अतुल लाहिगडे, कासेगाव- शरद लाहिगडे, हरिकन्स, सागर पाटील, जुने खेड- स्फूर्ती रॉयल्स. यावेळी संघांची नावे, आयकॉन खेळाडू तसेच अ, ब, क श्रेणीच्या खेळाडूंची चिठ्ठीद्वारे निवड करण्यात आली.
यावेळी देवराज पाटील, रणजित पाटील, शिवाजी पवार, रवींद्र पाटील, पृथ्वीराज पाटील, अतुल लाहिगडे, कुणाल पाटील, सदानंद पाटील, आयुब हवालदार,अशोक इदाते, सागर जाधव, उमेश रासनकर उपस्थित होते.
फोटो- ०३०२२०२१-आयएसएलएम-कबड्डी लीग न्यूज
राजारामनगर येथे जयंत स्पोर्ट्सच्या ‘जयंत कबड्डी प्रीमिअर लीग’च्या आयकॉन खेळाडूंच्या गौरवप्रसंगी देवराज पाटील, खंडेराव जाधव, रणजित पाटील, शिवाजी पवार, रवींद्र पाटील, पृथ्वीराज पाटील, कुणाल पाटील, अतुल लाहिगडे उपस्थित होते.