शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

तासगावचे कारभारी ‘बोलण्यात फायर; कामात फ्लॉवर’

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2022 13:51 IST

गेल्या पाच वर्षांत अपवाद वगळता बहुतांश कारभाऱ्यांचा कारभार ‘बोलण्यात फायर आणि कामात 'फ्लॉवर’ असाच राहिला आहे.

दत्ता पाटीलतासगाव : तासगाव नगरपालिकेच्या निवडणुकीचे वेध नेत्यांसह, कार्यकर्त्यांना लागले आहेत. मावळत्या सभागृहातील सत्ताधाऱ्यांसह विरोधी नगरसेवकांचा कारभार पाहिला, तर येणाऱ्या निवडणुकीची भिस्त नेत्यांवरच असल्याच दिसते. गेल्या पाच वर्षांत अपवाद वगळता बहुतांश कारभाऱ्यांचा कारभार ‘बोलण्यात फायर आणि कामात फ्लॉवर’ असाच राहिला आहे.नगरपालिकेची गत निवडणूक अटीतटीने झाली. भाजपला बहुमतासह सत्ता मिळाली, जनतेने विरोधक म्हणून राष्ट्रवादीच्या आठ नगरसेवकांनाही सभागृहात पाठवले. खासदार संजयकाका पाटील यांचा एकहाती अंमल असल्याने कोट्यवधींचा निधी तासगावात आला.मात्र, हा निधी खर्च करताना भ्रष्टाचाराचे अनेक कारनामे चव्हाट्यावर आले. कोट्यवधीच्या विकासकामांचा गाजावाजा करत सत्ताधाऱ्यांनी पाच वर्षांचा कालावधी पूर्ण केला. या कामांचा दर्जा, झालेली कामे जनतेच्या हिताची किती आणि कारभाऱ्यांच्या हिताची किती? याबाबत अनेक प्रश्न आहेत. दुसरीकडे विरोधक म्हणून राष्ट्रवादीच्या कारभाऱ्यांची अवस्था तर त्याहून बिकट. नगरसेवक म्हणून सभागृहात बोलायला संधी नाही. सभागृहाबाहेर विरोधक म्हणून प्रभाव नाही. अशा कसरतीत पाच वर्षे कधी निघून गेली, हे त्यांनाही कळले नाही. अर्थात दोन्ही पक्षांतील मोजक्या नगरसेवकांचा याला अपवाद आहे. पण बहुतांश नगरसेवकांचा सगळा कारभार ‘बोलण्यात फायर आणि कामात फ्लॉवर’ असाच राहिला. त्यांना राजकारण आणि ठेकेदारीतच रसराजकारणात आणि ठेकेदारीतच जास्त रस आहे. सभागृहात विकासकामे, जनतेच्या प्रश्नांवर मौन धारण करुन 'फ्लॉवर' असणारे कारभारी पार्टी मिटींगमध्ये मात्र 'फायर' होऊन ठेकेदारीसाठी एकमेकांवर धावून जात होते, हेच चित्र पाच वर्षात दिसले. अर्थात सत्ताधाऱ्यांसह विरोधकही याला अपवाद नाहीत.नियम डावलून खर्चजनतेच्या हिताच्या किती प्रश्नांची सोडवणूक केली, याचे उत्तर मिळण्याची खात्री नाही. खासदारांच्या पाठपुराव्याने आलेला निधी स्वत:च्या सोईनुसार कधी नियम डावलून, तर कधी नियमात बसवून खर्ची टाकायचा. ठेकेदाराची शिफारश करुन, तर कधी ठेकेदार तयार करुन काम करायचे आणि स्वत:चे भले करायचे, असाच अनुभव आहे. निवडणुकीत झालेला आणि होणारा खर्च याचा ताळमेळ लावण्यात पाच वर्षे निघून गेली.

टॅग्स :SangliसांगलीPoliticsराजकारण