शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस उपअधीक्षकांना फोन लावून युवतीचा आत्महत्येचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 10:58 IST

Crime News Police sangli-कुटुंबातून सुरुवातीला विरोध आणि नंतर होकार मिळाला. मात्र, त्याने धोका दिल्याने प्रेमभंग झाल्याच्या उद्विग्नतेतून शिराळा तालुक्यातील युवतीने थेट पोलीस उपअधीक्षकांना फोन लावत हाताच्या शिरा कापून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. तसेच या घटनेला त्याला जबाबदार धरा, असेही फोनवर सांगितले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पोलिसांच्या निर्भया पथकाने दत्त टेकडी परिसरात धाव घेत या युवतीला रुग्णालयात दाखल करून तिचे प्राण वाचवले. बुधवारी सकाळी ११ च्या सुमारास ही घटना घडली.

ठळक मुद्देपोलीस उपअधीक्षकांना फोन लावून युवतीचा आत्महत्येचा प्रयत्नप्रेमभंगातून हाताच्या शिरा कापून घेतल्या

इस्लामपूर : कुटुंबातून सुरुवातीला विरोध आणि नंतर होकार मिळाला. मात्र, त्याने धोका दिल्याने प्रेमभंग झाल्याच्या उद्विग्नतेतून शिराळा तालुक्यातील युवतीने थेट पोलीस उपअधीक्षकांना फोन लावत हाताच्या शिरा कापून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. तसेच या घटनेला त्याला जबाबदार धरा, असेही फोनवर सांगितले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पोलिसांच्या निर्भया पथकाने दत्त टेकडी परिसरात धाव घेत या युवतीला रुग्णालयात दाखल करून तिचे प्राण वाचवले. बुधवारी सकाळी ११ च्या सुमारास ही घटना घडली.शिराळा तालुक्यातील ही युवती इस्लामपूर शहरात पदवीचे शिक्षण घेण्यासाठी येत होती. सोलापूर जिल्ह्यातील युवकाशी तिचे प्रेमसंबंध जुळले होते. सुरुवातीला युवतीच्या घरातून याला विरोध झाला. त्यानंतर काही काळाने होकार मिळाला. मात्र, तोपर्यंत दोघांच्या प्रेमात दुरावा निर्माण झाला होता. काही दिवसांपूर्वी या युवतीने येथील पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांची भेट घेऊन याची माहिती दिली. त्यांनी शैक्षणिक प्रगतीवर लक्ष देण्याचा सल्ला तिला दिला.मात्र, बुधवारी सकाळी या युवतीने कामेरी रस्त्यावरील दत्त टेकडीवर आपल्या दोन्ही हातांच्या मनगटाजवळ कापून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. या घटनेची माहिती मिळताच अधिकाऱ्यांनी निर्भया पथकाला तातडीने धाडले. पथकातील हवालदार संपत वारके, महिला पोलीस अक्काताई नलवडे, उषा पाटील व इतरांनी या युवतीला खासगी रुग्णवाहिकेतून उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तेथे तिच्यावर तातडीने उपचार करण्यात आले. त्यामुळे तिला जीवदान मिळाले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसSangliसांगली