मिरजेत मुलाकडून वडिलांच्या खुनाचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:24 IST2021-01-18T04:24:50+5:302021-01-18T04:24:50+5:30
विलास पवार हे साईनाथनगर (सुभाषनगर) येथे वास्तव्यास आहेत. मुलगा सुनील याने राहते घर विकून गाव सोडून जाण्यासाठी वडिलांकडे तगादा ...

मिरजेत मुलाकडून वडिलांच्या खुनाचा प्रयत्न
विलास पवार हे साईनाथनगर (सुभाषनगर) येथे वास्तव्यास आहेत. मुलगा सुनील याने राहते घर विकून गाव सोडून जाण्यासाठी वडिलांकडे तगादा लावला होता. मात्र विलास पवार त्याला विरोध करीत होते. शुक्रवारी (दि. १५) सकाळी सुनील याने विलास यांच्याकडे घर विक्री करण्याची मागणी केली. मात्र त्याला विलास यांनी नकार दिल्याने संतापलेल्या सुनील याने वडील विलास यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यांना खाली पाडून छातीवर बसून ‘घराची जागा विकली नाहीस तर जिवंत सोडत नाही,’ असे म्हणून गळा दाबून ठार मारण्याचा प्रयत्न केला. पवार कुटुंबीयांनी मुलाच्या तावडीतून सुटका केल्याने विलास पवार बचावले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली होती. याबाबत मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात नोंद आहे.