सांगलीत घर फोडून चोरीचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:23 IST2021-02-05T07:23:16+5:302021-02-05T07:23:16+5:30
सांगली : शहरातील कोल्हापूर रोड परिसरात बंद घराचा दरवाजा उचकटून चोरीचा प्रयत्न करण्यात आला. चाेरट्यांनी आत प्रवेश करीत साहित्य ...

सांगलीत घर फोडून चोरीचा प्रयत्न
सांगली : शहरातील कोल्हापूर रोड परिसरात बंद घराचा दरवाजा उचकटून चोरीचा प्रयत्न करण्यात आला. चाेरट्यांनी आत प्रवेश करीत साहित्य विस्कटून टाकले. या प्रकरणी आनंदराव शामराव आंबे (रा. लठ्ठे हौसिंग सोसायटी, कोल्हापूर रोड, सांगली) यांनी शहर पोलिसांत फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, फिर्यादी आनंदराव आंबे यांचे पुतण्यांचे घर असून ते बाहेरगावी गेल्याने घर बंद हाेते. २० ते २४ जानेवारीदरम्यान घर बंद असल्याची संधी साधून चोरट्यांनी दरवाजाचा कडीकोयंडा उचकटून घरात प्रवेश केला व बेडरूममधील तिजोरी उघडून त्यातील साहित्य अस्त्याव्यस्त फेकून दिले. बेडरूममध्ये काही मिळत नाही हे लक्षात आल्यानंतर चोरट्यांनी स्वयंपाकघरातील धान्याचे डबे काढत चोरीचा प्रयत्न केला. चोरीचा प्रयत्न लक्षात आल्यानंतर आंबे यांनी पोलिसांत फिर्याद दिली.