गोटखिंडीत पाच ठिकाणी घरफोडीचे प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:19 IST2021-02-05T07:19:27+5:302021-02-05T07:19:27+5:30
येथील इस्लामपूर स्त्यावर घरांचा कडी-कोयंडा उचकटून चोरटे घरात प्रवेश करण्याचा प्रयत्न करीत असताना तेथील लोक जागे झाल्याने चोरट्यांनी पलायन ...

गोटखिंडीत पाच ठिकाणी घरफोडीचे प्रयत्न
येथील इस्लामपूर स्त्यावर घरांचा कडी-कोयंडा उचकटून चोरटे घरात प्रवेश करण्याचा प्रयत्न करीत असताना तेथील लोक जागे झाल्याने चोरट्यांनी पलायन केले. विजय पाटील यांच्या घराचा मागील बाजूचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला, नंतर तेथून पुढील हुतात्मा साखर कारखान्याचे संचालक संदीप पाटील यांच्या घराचा पाठीमागील दरवाजा पहाटे चारच्या सुमारास उचकटताना आवाज आला. यामुळे पाटील यांनी बाहेरील दिवा चालू केला. यावेळी चोरट्यांनी दरवाजा ढकलून घरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला; तेव्हा पाटील यांनी दरवाजा दाबून धरत आरडाओरडा केला. यामुळे चोरटे पळून गेले.
यानंतर चोरट्यांनी त्याच रस्त्यावरील शहाजी कांबळे यांच्याही घराचा दरवाजा फोडण्याचा प्रयत्न केला. याशिवाय सुभाष देशमुख यांचे आणि शिंगटे मळा येथेही एका घराचा दरवाजा उचकटण्याचा प्रयत्न केला.