शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: विहिरीत मुक्काम ठोकलेल्या मगरीला जिवंत गाडण्याचा प्रयत्न, प्राणीमित्रांनी केली सुटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2025 16:44 IST

मगरीला बांधून बैलगाडीतून अन्यत्र नेण्यात आले

कवठेमहांकाळ : विहिरीत सहा महिन्यांपासून मुक्काम ठोकून राहिलेल्या मगरीला जिवंत पुरून मारण्याचा प्रयत्न शेतकऱ्याने केला. याची माहिती मिळताच प्राणीमित्रांनी धाव घेत मगरीची सुटका केली. तिला मुक्त करून नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.अग्रण धुळगाव (ता. कवठेमहांकाळ) येथे शुक्रवारी हा प्रकार घडला. प्राणीमित्रांच्या सतर्कतेमुळे मगरीचा प्राण वाचला. गावात अग्रणी नदीपासून सुमारे तीन किलोमीटर अंतरावरील एका शेतात मगरीने मुक्काम ठोकला होता. सुमारे सहा ते सात वर्षे वयाच्या पूर्ण वाढ झालेल्या या मगरीचा कोणालाही त्रास नव्हता. शेतातील विहीरवजा मोठ्या खड्ड्यात ती राहायची. म्हैसाळ सिंचन योजनेच्या कालव्यातून पिलू असताना ती अग्रणी नदीत आली असावी, असा अंदाज प्राणीमित्रांनी व्यक्त केला.अग्रणीचे पाणी कमी होईल, तसे तिने शेजारी विहिरीत स्थलांतर केले. गेल्या सहा महिन्यांपासून ती या विहीरवजा खड्ड्यात राहत होती. तिच्या शरीराच्या आकारमानाच्या मानाने विहीर छोटीच होती. मात्र, अन्यत्र अधिवासासाठी नदी, नाला किंवा विहीर नसल्याने तिने तेथेच मुक्काम केला होता.शेतात राहण्यास कोणी नसले, तरी गोठ्यात शेतकऱ्याची जनावरे होती. शेतकऱ्यांना तसेच शेतमजुरांना मगर नेहमी दिसायची; पण तिने कोणाला त्रास दिला नव्हता. तिला विहिरीतून काढून अन्यत्र सोडण्याची मागणी या शेतकऱ्याने वन विभागाकडे, तसेच प्राणीमित्रांकडे वारंवार केली होती. तिच्या सुटकेसाठी कर्मचारी काही वेळा गेलेदेखील, मात्र त्यावेळी ती विहिरीत आढळली नव्हती.त्रस्त झालेल्या शेतकऱ्याने शेवटी विहिरीच बुजविण्याचा निर्णय घेतला. शुक्रवारी जेसीबी बोलवून विहिरीत माती भरण्याचे काम सुरू केले. विहीर बुजू लागली, तशी मगरीने बाहेर धाव घेण्याचा प्रयत्न सुरू केला. याची माहिती शेतकऱ्याने वन विभाग व प्राणीमित्रांना दिली. त्यांनी गावात धाव घेऊन मगरीला विहिरीतून बाहेर काढले. कासऱ्याने बांधून बैलगाडीतून अन्यत्र नेले. सायंकाळी तिला नैसर्गिक अधिवासात सोडून दिले. त्यांच्या तत्परतेने मगरीचे प्राण वाचले. या मोहिमेत वनरक्षक परीक्षित जाधव, गणेश भोसले, सचिन साळुंखे किरण नाईक, रूपेश साळुंखे, संदीप जाधव, मंदार सूर्यवंशी आदींनी भाग घेतला.

जेसीबी चालक घाबरलाविहीर बुजवण्यासाठी शेतकऱ्याने जेसीबी भाड्याने बोलवला होता. मात्र, विहिरीत मगर असल्याचे जेसीबी चालकाला सांगितले नव्हते. विहिरीत माती भरण्याचे काम सुरू असताना मगर बाहेर येऊ लागली. हे पाहताच जेसीबी चालकाने त्वरित काम थांबवले. आपण विहीर बुजवणार नाही, असे स्पष्ट केले. त्यामुळे शेतकऱ्याने वन विभाग व प्राणीमित्रांना बोलावून घेतले.

टॅग्स :Sangliसांगलीforest departmentवनविभागFarmerशेतकरी