शहरं
Join us  
Trending Stories
1
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
2
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
3
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
4
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार
5
केदारनाथला जाण्यासाठी हेलिकॉप्टरचं तिकीट किती? अपघात झाल्यास कोण देतं भरपाई?
6
Bhiwandi Fire: भिवंडीत भीषण आगीत, १२ केमिकल गोदामे जळून खाक!
7
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
8
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
9
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
10
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
11
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
12
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
13
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
14
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
15
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
16
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
17
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
18
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
19
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
20
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया

प्राचार्यांच्या धमकीने विद्यार्थ्याचा आत्महत्येचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2017 04:25 IST

प्राचार्यांनी अर्वाच्च व अश्लील भाषेत शिवीगाळ करून नापास करण्याची धमकी दिल्याने येथील डी. फार्मसीच्या पहिल्या वर्षात शिकणा-या विद्यार्थ्याने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला.

कवठेमहांकाळ (जि. सांगली) : प्राचार्यांनी अर्वाच्च व अश्लील भाषेत शिवीगाळ करून नापास करण्याची धमकी दिल्याने येथील डी. फार्मसीच्या पहिल्या वर्षात शिकणा-या विद्यार्थ्याने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. अक्षय नागनाथ लोकरे (वय १९, रा. टेंभुर्णी, ता. माढा, जि. सोलापूर) असे विद्यार्थ्याचे नाव असून, त्याची प्रकृती गंभीर आहे.अक्षयच्या वडिलांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. लांडगेवाडी (ता. कवठेमहांकाळ) येथील नूतन कॉलेज आॅफ फार्मसीमध्ये पहिल्या वर्षात अक्षय शिकत आहे. तो आजारी असल्याने शनिवारी दुपारी न सांगता महाविद्यालयातून घरी गेला. सोमवारी परत आला असता, शिक्षिका स्नेहल शिंदे यांनी न विचारता घरी गेल्याबद्दल दंड भरावा लागेल, असे सांगितले. तो नियमानुसार पन्नास रुपये दंड भरण्यास तयार झाला. परंतु शिंदे यांनी पाचशे रुपये द्यावे लागतील, असे सांगितले. यावर अक्षयने नियमानुसार दंड भरणार व वर्गात बसणार, अशी भूमिका घेतली. त्यानंतर शिंदे यांनी प्राचार्य अझरुद्दीन आत्तार यांना बोलावले. आत्तार यांनी अक्षयला अर्वाच्च भाषेत शिवागीळ केली, अपमानास्पद वागणूक देऊन नापास करण्याची धमकी दिली व उद्यापासून वर्गात येऊ नकोस, असे सुनावले. याची भीतीपोटी अक्षयने आत्महत्येचा प्रयत्न केला. त्याच्या मित्रांनी तातडीने कवठेमहांकाळच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. परंतु प्रकृती गंभीर बनल्याने त्याला मिरज शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले.

टॅग्स :Crimeगुन्हाStudentविद्यार्थी