पत्नीला गळफास लावून ठार मारण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:26 IST2021-04-15T04:26:46+5:302021-04-15T04:26:46+5:30

जखमी रेखा विरसूर यांनी पती प्रकाश भीमराव विरसूर, विद्या अमोगी कांबळे, अनिल अमोगी कांबळे (सर्व रा. म्हैसाळ, ता. मिरज) ...

Attempt to strangle his wife | पत्नीला गळफास लावून ठार मारण्याचा प्रयत्न

पत्नीला गळफास लावून ठार मारण्याचा प्रयत्न

जखमी रेखा विरसूर यांनी पती प्रकाश भीमराव विरसूर, विद्या अमोगी कांबळे, अनिल अमोगी कांबळे (सर्व रा. म्हैसाळ, ता. मिरज) यांच्याविरुद्ध ग्रामीण पोलिसात फिर्याद दिली आहे. रेखा यांनी पती प्रकाश यास सोमवारी सकाळी कामाला जाण्यास सांगितले. त्यावेळी प्रकाश हा रागाच्या भरात पत्नीस मारहाण करून कामावर गेला. कामावरुन पुन्हा घरी येऊन रेखा यांना मारहाण केल्याने रेखा यांनी प्रकाश यास ‘मला मारहाण करणार असाल तर मी माहेरी जाते’ असे म्हटले. यामुळे संतप्त झालेल्या प्रकाश, विद्या व अनिल या तिघांनी रेखा यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत एका डब्यावर उभे करून छताला बांधलेल्या साडीने गळफास लावला. पायाखालील डब्याला लाथ मारुन रेखा यांना गळफासाने जीवे मारण्याचा प्रयत्न केला. परंतु यातून रेखा या बचावल्या. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रेखा यांच्या खुनाचा प्रयत्न केल्याबद्दल पतीसह तिघांविरुद्ध मिरज ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Attempt to strangle his wife