मिरजेत डॉक्टरांच्या घरात घुसून चाकूहल्ल्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:30 IST2021-08-22T04:30:00+5:302021-08-22T04:30:00+5:30
स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. आनंद यादव यांचे गांधी चौक ते चर्च रस्त्यावर रुग्णालय व पहिल्या मजल्यावर घर आहे. शुक्रवार दि. २० ...

मिरजेत डॉक्टरांच्या घरात घुसून चाकूहल्ल्याचा प्रयत्न
स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. आनंद यादव यांचे गांधी चौक ते चर्च रस्त्यावर रुग्णालय व पहिल्या मजल्यावर घर आहे. शुक्रवार दि. २० रोजी सकाळी साडेसात वाजता डाॅ. यादव घरात व्यायाम करीत होते. यावेळी अंगात काळे कपडे व काळा मास्क लावलेल्या ३० ते ३५ वर्षे वयाच्या अज्ञात चोरट्याने घराच्या वरच्या मजल्यावर जाण्यास असलेल्या जिन्यावरून पाठीमागील बाजूने प्रवेश केला. त्याने डॉ. यादव यांना चाकूचा धाक दाखवत ‘मोबाइल, दागिने, रोख रक्कम कोठे आहे?’ अशी विचारणा केली. डाॅक्टरांनी मदतीसाठी आरडाओरडा सुरु केल्याने चोरट्याने अंगावर धावून जात त्यांना मारण्यासाठी चाकू उगारला. त्यावेळी डॉ. यादव यांच्या पत्नी खोलीतून बाहेर आल्या. अज्ञाताने डॉ. यादव यांच्या पत्नीलाही चाकूचा धाक दाखवला. यावेळी दोघांनी आरडाओरडा सुरु केल्याने अज्ञात चोरट्याने चर्चच्या दिशेने पलायन केल्याची तक्रार डॉ. यादव यांनी मिरज शहर पोलिसात दिली आहे. डाॅक्टरांच्या घरात घुसून चाकूहल्ल्याचा प्रयत्न झाल्याने वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली होती.