शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

मुलाला वाचविण्याच्या प्रयत्नात आईचा शेततळ्यात बुडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2019 23:49 IST

शेततळ्यात पोहताना बुडणाऱ्या १३ वर्षाच्या स्वत:च्या मुलाला वाचविण्याच्या प्रयत्नात अर्चना अर्जुन हिंगे (वय ४५, रा. बलवडी-खा.) या महिलेचा मृत्यू झाल्याची घटना

ठळक मुद्देबलवडी (खा.) येथील घटना : प्रसंगावधानामुळे मुलगा बचावलापाण्यात बुडत असलेल्या हर्षद यास वाचविण्यासाठी शेततळ्यात उडी मारली. परंतु, त्यांनाही पोहता येत नसल्याने त्या पाण्यात बुडू लागल्या.

विटा/खानापूर : शेततळ्यात पोहताना बुडणाऱ्या १३ वर्षाच्या स्वत:च्या मुलाला वाचविण्याच्या प्रयत्नात अर्चना अर्जुन हिंगे (वय ४५, रा. बलवडी-खा.) या महिलेचा मृत्यू झाल्याची घटना खानापूर तालुक्यातील बलवडी (खा.) येथे सोमवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली. यावेळी शेततळ्याच्या पाण्यात बुडत असलेला हर्षद अर्जुन हिंगे (१३) हा स्थानिक लोकांच्या प्रसंगावधानाने बचावला.

बलवडी (खा.) येथील अर्चना हिंगे गावाजवळच्या चव्हाण मळा (शंभूखडी) येथे शेतात राहत होत्या. त्यांच्या घराजवळच मोठे शेततळे आहे. सोमवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास हर्षद हा त्यांचा १३ वर्षाचा मुलगा पोहण्यासाठी शेततळ्यात उतरला. परंतु, पाणी जास्त असल्याने तो पाण्यात बुडू लागला. हा प्रकार त्याची आई अर्चना यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी पाण्यात बुडत असलेल्या हर्षद यास वाचविण्यासाठी शेततळ्यात उडी मारली.

परंतु, त्यांनाही पोहता येत नसल्याने त्या पाण्यात बुडू लागल्या. हा प्रकार लक्षात येताच परिसरातील ग्रामस्थ मदतीसाठी धावले. अर्चना व हर्षद दोघांनाही पाण्याबाहेर काढण्यात आले. दोघांनाही खानापूर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. परंतु, उपचारापूर्वीच अर्चना यांचा मृत्यू झाला होता, तर हर्षद बचावला.या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. घटनेची नोंद विटा पोलिसांत असून उपनिरीक्षक सुप्रिया दुरंदे तपास करीत आहेत.मुलीची आरडाओरडत्यावेळी शेततळ्याजवळ असलेल्या अर्चना यांच्या मुलीने आरडाओरडा केल्यानंतर शेतात असलेल्या स्थानिक लोकांनी शेततळ्याकडे धाव घेतली. लोकांनी प्रसंगावधान राखून शेततळ्याच्या पाण्यातून अर्चना व हर्षद यांना बाहेर काढले. अर्चना यांच्या नाका-तोंडात पाणी गेले होते.

टॅग्स :SangliसांगलीDeathमृत्यू