दुय्यम निबंधक कार्यालयात बोगस दस्त नोंदणीचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:29 IST2021-04-09T04:29:36+5:302021-04-09T04:29:36+5:30

सांगली : दुय्यम निबंधक कार्यालयात बोगस दस्त नोंदविण्याचा प्रयत्न गुरूवारी झाला. बोगस प्लॉटचा मालक उभा करून हा प्रयत्न झाला. ...

Attempt to register bogus diarrhea in the office of secondary registrar | दुय्यम निबंधक कार्यालयात बोगस दस्त नोंदणीचा प्रयत्न

दुय्यम निबंधक कार्यालयात बोगस दस्त नोंदणीचा प्रयत्न

सांगली : दुय्यम निबंधक कार्यालयात बोगस दस्त नोंदविण्याचा प्रयत्न गुरूवारी झाला. बोगस प्लॉटचा मालक उभा करून हा प्रयत्न झाला. मात्र, दुय्यम निबंधकांच्या सतर्कतेमुळे हे उघडकीस आले. अविनाश पाटील ( रा.निमशिरगाव,जि. कोल्हापूर) असे संशयिताचे नाव असून रात्री उशिरापर्यंत पोलिसांकडून त्याची चौकशी चालू होती.

दस्तनोंदणीसाठी दुय्यम निबंधक कार्यालयात नेहमीच गर्दी असते. गुरूवारी येथील दुय्यम निबंधक कार्यालयात ॲड. राहुल जाधव यांनी दस्त नोंदविण्यासाठी नोंदणी केली होती. नोंदणीसाठी दिलेल्या दस्तातील मजकुरानुसार कुपवाड येथील या प्लॉटला सहा लाख रूपये किंमत ठरविण्यात आली होती. अर्जुन जाधव यांचा हा प्लॉट आहे.

प्लॉट खरेदीसाठी खरेदीदार व विक्री करणारे व त्यांच्यासोबत खरेदी प्रक्रियेसाठी साक्षीदारही उपस्थित असताना कागदपत्रामधील आधारकार्डबाबत उपनिबंधक हंगे यांना साशंकता वाटली. त्याबाबत त्यांनी शहानिशा केली असता, आधारकार्ड वेगळेच असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर त्यांनी तातडीने याबाबत शहर पोलिसांना कल्पना दिली. त्यानंतर नागरिकांच्या मदतीने बोगस प्लॉट मालक म्हणून तिथे असलेल्या व्यक्तीला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. ॲड. जाधव यांनीही बोगस व्यक्तीविरोधात कारवाईची मागणी केली. पोलिसांकडून त्याची रात्री उशिरापर्यंत चौकशी चालू होती.

Web Title: Attempt to register bogus diarrhea in the office of secondary registrar