शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: मराठा आरक्षणासाठी तहसीलदार कक्षातच डिझेल अंगावर ओतून युवकाचा आत्मदहनाचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2023 13:30 IST

प्रशासनाची तारांबळ

विकास शहाशिराळा:  मराठा आरक्षण हवेच , मी स्वतः भोगत आहे माझ्या पत्नीने वीस वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा दिल्या मात्र एक दोन गुणांनी तिची निवड होऊ शकली नाही कारण आम्हाला आरक्षण नाही, मग जगायचे कश्याला ? मनोज जिरंगे यांची उचललेले पाऊल योग्य आहे त्यांच्या आंदोलनाला माझा पाठिंबा आहे असे म्हणत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष देवेंद्र वसंत धस (वय ३७ , बिळाशी ) यांनी तहसीलदार यांच्या कक्षात कार्यालयीन वेळेपूर्वीच डिझेल अंगावर ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. यामुळे प्रशासनाची तारांबळ उडाली मात्र तहसीलदार शामला खोत पाटील यांनी एकट्या त्यांच्या कक्षामध्ये जाऊन म्हणणे ऐकून घेऊन समजूत काढली यानंतर धस यांनी तहसीलदार कार्यालयासमोर उपोषणास सुरुवात केली.सकाळी ८:४५ वाजता धस हे तहसीलदार कार्यालयात आले तेथून त्यांनी काही अधिकाऱ्यांना फोन लावले. ९:१५ वाजता त्यांनी तहसीलदार कक्षात प्रवेश केला व त्यांनी दरवाजा आतून कडी नसल्याने खुर्च्या लावून बंद केला. कार्यालय सुरू होण्यापूर्वीच ही घटना घडली त्यामुळे सर्वांचीच तारांबळ उडाली. घटनेची माहिती सर्वत्र पसरताच कार्यालयाजवळ पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर जंगम, सहाय्यक पोलीस निरीक्षक जयसिंगराव पाटील, माजी ग्रामपंचायत सदस्य अजय जाधव, रयत क्रांती संघटनेचे तालुकाध्यक्ष सत्यजित कदम, विनोद कदम आले. दरवाजा बंद असल्याने त्यांनी खिडकीतून देवेंद्र यांना समजावण्याचा प्रयत्न केला. तहसीलदार शामला खोत पाटील कार्यालयात आल्यानंतर त्यांनीही देवेंद्र यांना समजावण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर देवेंद्र यांनी तहसीलदार यांनी माझ्या व्यथा समजून घ्याव्यात अशी भूमिका घेतली. तहसीलदार कक्षात कोणतीही पर्वा न करता तहसीलदार खोत या गेल्या.यावेळी बाहेर उपस्थित अधिकारी, पोलीस यंत्रणा, नागरिक यांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले. कारण तहसीलदार एकट्याच आत! यादरम्यान पोलिसांनी अग्निशमन यंत्रणा, घोंगडे आदी आग विझविण्यासाठीची यंत्रणा सज्ज केली. अखेर २० मिनिटे समजावून सांगितले नंतर कक्षाचा दरवाजा उघडण्यात आला यावेळी सर्व उपस्थितांनी निश्वास टाकला.यावेळी देवेंद्र यांनी मी आरक्षण नसल्याने काय होते आहे हे भोगतो आहे , मला व कुटुंबाला जगणे अवघड झाले आहे. माझी  पत्नी गौरी हिने  वीस वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा दिल्या मात्र एक दोन गुणांनी तिची निवड होऊ शकली नाही कारण आम्हाला आरक्षण नाही, मग जगायचे कश्याला ? मनोज जिरंगे यांची उचललेले पाऊल योग्य आहे त्यांच्या आंदोलनाला माझा पाठिंबा आहे.मोठमोठे नेतेमंडळी दाखले घेऊन बसले आहेत त्यांना आमच्या सामान्य मराठी जनतेशी काही देणे घेणे नाही.    तहसीलदार कार्यालयासमोर मंडप टाकून देवेंद्र यांनी आमरण उपोषणास सुरुवात केली. तर माझ्यामुळे आपणा सर्वांना त्रास झाला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली.नेतेमंडळींनी कुणबी दाखले मिळवून फायदा घेतलाआपण आज येताना आईच्या पायापडूनच आलो आहे. मी आरक्षणासाठी आत्मदहन करणार असे सांगूनच ! आम्ही किती यातना सोसायच्या ? आज माझी परिस्थिती बेताचीच आहे .या तालुक्यातील अनेक अधिकारी , नेतेमंडळी यांनी कुणबी दाखले मिळवून फायदा घेतला आहे आम्ही सर्वमान्यांनाच याच्या यातना सोसाव्या लागत आहेत ही आमच्या मराठा समाजाची शोकांतिका आहे.

टॅग्स :SangliसांगलीMaratha Reservationमराठा आरक्षण