कोकळेत महिला तलाठ्यांना मारण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:40 IST2021-02-26T04:40:16+5:302021-02-26T04:40:16+5:30

कोकळे (ता. कवठेमहांकाळ) येथे तलाठी कार्यालयात सात-बारा उतारा मागणीवरून एकाने महिला तलाठ्यांना अरेरावी करून खुर्ची उचलून डोक्यात घालण्याचा प्रयत्न ...

Attempt to kill female talattas in Kokle | कोकळेत महिला तलाठ्यांना मारण्याचा प्रयत्न

कोकळेत महिला तलाठ्यांना मारण्याचा प्रयत्न

कोकळे (ता. कवठेमहांकाळ) येथे तलाठी कार्यालयात सात-बारा उतारा मागणीवरून एकाने महिला तलाठ्यांना अरेरावी करून खुर्ची उचलून डोक्यात घालण्याचा प्रयत्न केला. यामुळे शासकीय कामात अडथळा केल्याप्रकरणी तलाठी पार्वती शिवाजी वायदंडे यांनी कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात फिर्यादी दिली आहे. अरुण पांडुरंग माने (रा. करलहट्टी) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

कोकळे येथे तलाठी कार्यालयात तलाठी पार्वती वायदंडे व कोतवाल दिलीप कृष्णदेव चौगुले हे सोशल ऑडिटिंगचे काम करत होते. यावेळी अरुण माने हा तिथे येऊन सातबारा मागणी करू लागला. त्यावेळी वायंदडे यांनी तुम्ही मागणी अर्ज द्या, थोड्यावेळाने तुम्हाला उतारा काढून देते, असे सांगितले. मात्र, अरुण माने याने आत्ताच उतारा द्या असे म्हणत वाद घातला व तलाठी वायदंडे यांच्या डोक्यात खुर्ची घालण्याचा प्रयत्न केला. तसेच कोतवाल दिलीप चौगुले यांच्या अंगावर थुंकला. यानंतर तलाठी पार्वती वायदंडे यांनी अरुण माने याच्याविरुद्ध फिर्याद दाखल केली. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक अक्षय ठिकणे हे करत आहेत.

Web Title: Attempt to kill female talattas in Kokle