विद्यार्थ्यांमध्ये शालेय जीवनातच वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:49 IST2021-03-04T04:49:39+5:302021-03-04T04:49:39+5:30

पेठनाका येथील व्यंकटेश्वरा पब्लिक स्कूलमध्ये आयोजित विज्ञान दिवस कार्यक्रमात मुलांनी अशी चित्रे रेखाटली. लोकमत न्यूज नेटवर्क इस्लामपूर : सध्याचे ...

Attempt to inculcate scientific attitude in students in school life itself | विद्यार्थ्यांमध्ये शालेय जीवनातच वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्याचा प्रयत्न

विद्यार्थ्यांमध्ये शालेय जीवनातच वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्याचा प्रयत्न

पेठनाका येथील व्यंकटेश्वरा पब्लिक स्कूलमध्ये आयोजित विज्ञान दिवस कार्यक्रमात मुलांनी अशी चित्रे रेखाटली.

लोकमत न्यूज नेटवर्क

इस्लामपूर : सध्याचे युग हे विज्ञानाचे आहे. देशाची प्रगती विज्ञानावरच अवलंबून असते. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये शालेय जीवनातच वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्याचा प्रयत्न व्यंकटेश्वरा पब्लिक स्कूलमध्ये केला जातो, असे प्रतिपादन संस्थापक राहुल महाडिक यांनी केले.

पेठनाका (ता. वाळवा) येथील श्री व्यंकटेश्वरा शिक्षण संस्था संचलित व्यंकटेश्वरा पब्लिक स्कूलमध्ये विविध उपक्रमांद्वारे विज्ञान दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी वक्तृत्व, प्रयोग, रांगोळी, चित्रकला आणि प्रश्नमंजूषा असे विविध उपक्रम घेण्यात आले. प्राचार्या डॉ. शांती कृष्णमूर्ती यांच्या मार्गदर्शनाखाली हे उपक्रम झाले.

वक्तृत्व स्पर्धेत सानिका वाघमारे, श्रावणी सावंत, संस्कृती खोत. रांगोळी स्पर्धेत दिशा पाटील, ईश्वरी खोत, अनुष्का गावडे. प्रयोग स्पर्धेत पीयुषा औताडे, प्रांजल पवार, अमरनाथ शेटे, राजवीर वारके यांनी यश मिळविले. मनस्वी सतीश महाडिक हिला उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले. यावेळी वेशभूषा, वृक्षारोपण करण्यात आले. शिक्षक मंदार रणदिवे, सविता कांबळे, स्नेहा गायकवाड यांनी संयोजन केले.

Web Title: Attempt to inculcate scientific attitude in students in school life itself