शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

दाभोलकरांच्या हत्येप्रकरणी तासगावमधून दोघे ताब्यात ‘एटीएस’चे छापे : सांगली जिल्ह्यातील पुरोगामी नेत्यांच्या सुरक्षेत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2018 21:30 IST

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी राज्य दहशतवादविरोधी (एटीएस) पथकाने गुरुवारी तासगाव येथे छापा टाकून दोन संशयितांना ताब्यात घेतले.

सांगली : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी राज्य दहशतवादविरोधी (एटीएस) पथकाने गुरुवारी तासगाव येथे छापा टाकून दोन संशयितांना ताब्यात घेतले. पथकाने या कारवाईबाबत कमालीची गोपनीयता बाळगली आहे. याच कारवाईच्या अनुषंगाने जिल्ह्यातील पुरोगामी नेत्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.

पंधरा दिवसांपूर्वी मुंबईतील नालासोपाऱ्यात मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा पकडला होता. याचा तपास करीत असतानाच दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी संशयित सचिन अंदुरे याच्यापर्यंत पोहोचण्यात यश आले होते. शस्त्रसाठ्याप्रकरणी काही संशयित अटकेत आहेत. त्यांच्या चौकशीतून आणखी काही जणांची नावे पुढे येत आहेत. त्यांना ताब्यात घेण्यासाठी एटीएसचे राज्यभर छापासत्र सुरू आहे.

दोन दिवसांपूर्वी पथकाने कोल्हापुरात छापे टाकले होते. त्यानंतर गुरुवारी सकाळी हे पथक सांगलीत दाखल झाले. पथकाने तासगाव शहरासह तालुक्यातही छापा टाकला. या छाप्यात दोघांना ताब्यात घेतले. स्थानिक पोलिसांची मदत न घेता पथकाने ही कारवाई केली. या कारवाईबाबत गोपनीयता बाळगली असल्याने त्यांची नावे व कारवाईचा सविस्तर तपशील समजू शकला नाही. ताब्यात घेतलेले दोघेही एका संस्थेशी संबंधित जुने आणि कट्टर कार्यकर्ते असल्याचे समजते.

दरम्यान, दाभोलकरांच्या हत्येप्रकरणी दोन संशयितांना तासगावमधून ताब्यात घेतल्यानंतर सांगली पोलिसांनी जिल्ह्यातील पुरोगामी नेत्यांच्या सुरक्षेत वाढ केली आहे. काही नेत्यांना यापूर्वीच संरक्षण दिले आहे, पण ते त्यांनी नाकारले होते. पण गुरुवारी स्वत: पोलिसांनी काही नेत्यांची भेट घेऊन, पोलिसांना सोबत घेतल्याशिवाय घराबाहेर पडू नका, अशी सक्त सूचना केली आहे.हालचालींवर नजरएका वादग्रस्त संस्थेचे तासगावसह तालुक्यात किती कार्यकर्ते आहेत, याची तासगाव पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. या कार्यकर्त्यांची यादीही बनविण्यात आली आहे. यामध्ये बारा कार्यकर्त्यांची नावे पुढे आली आहेत. त्यांच्या हालचालींवर नजर ठेवण्यात आली आहे. ही यादी एटीएसकडे सोपविण्यात येणार आहे.

टॅग्स :SangliसांगलीPoliceपोलिस