शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

आटपाडी तालुक्यात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढले-वर्षभरातील स्थिती : १९ टक्के गुन्ह्यांची नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2019 23:43 IST

तालुक्यात महिला व मुलींवरील आत्याचार व विनयभंगाच्या घटनांचा आलेख वाढत आहे. गेल्या वर्षभरात एकूण गुन्ह्यांमध्ये महिलांविषयक गुन्ह्यांचे प्रमाण १९ टक्क्यांवर गेले आहे. २0१७ च्या

ठळक मुद्देगतवर्षाच्या तुलनेतही गुन्ह्यांचा आलेख वाढल्याने पोलीस प्रशासनासमोर चिंता

अविनाश बाड ।आटपाडी : तालुक्यात महिला व मुलींवरील आत्याचार व विनयभंगाच्या घटनांचा आलेख वाढत आहे. गेल्या वर्षभरात एकूण गुन्ह्यांमध्ये महिलांविषयक गुन्ह्यांचे प्रमाण १९ टक्क्यांवर गेले आहे. २0१७ च्या तुलनेत ही आकडेवारीही वाढल्याचे दिसत आहे. वर्षात दर ४ ते ५ दिवसांतून एका निर्भयाला पोलीस ठाण्याची पायरी चढावी लागत आहे.

आटपाडी पोलीस ठाण्यात २०१८ मध्ये एकूण ३८९ गुन्हे दाखल झाले. त्यामध्ये खून, खुनाचा प्रयत्न, मारामारी, चोरी, जबरी चोरी असे सगळे गुन्हे नोंदविण्यात आले. पण यामध्ये ७४ गुन्हे हे केवळ महिला आणि मुलींवरील अत्याचाराचे दाखल झाले आहेत. २०१७ या वर्षाच्या तुलनेत २०१८ या एका वर्षात तालुक्यात महिला आणि मुलींच्या बाबतीतील गुन्ह्यांची संख्या वेगाने वाढत चालली आहे. ही संख्या केवळ पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या घटनांची आहे. अब्रू वेशीवर टांगायला नको, गरिबी आणि पुढाऱ्यांनी मिटविलेल्या प्रकरणांचा आकडा खूपच मोठा असण्याची शक्यता आहे.

दि. ३ जानेवारी २०१८ रोजी गळवेवाडी येथील प्रतीक्षा या ८ वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार करून केलेल्या तिच्या खुनाची घटना राज्यभर गाजली.तालुक्यात गेल्यावर्षी विवाहित महिलांसह अल्पवयीन मुलींचे अपहरणाचे प्रमाण वाढल्याचे स्पष्ट झाले आहे. ८ वी ते १० वीच्या आणि महाविद्यालयातील युवतींवरील अत्याचाराचे प्रमाण अधिक आहे. महिलांच्या तुलनेत अल्पवयीन मुलींवर होणाºया अत्याचाराचे प्रमाण या वर्षभरात कमालीचे वाढले आहे.पोलिसांचे लॉजवरील कारवाईकडे दुर्लक्ष!आटपाडी तालुक्यात लॉजची संख्या वाढली आहे. इयत्ता १० वीत शिकणाºया मुलीला शाळेच्या गणवेशात घेऊन आलेल्या नराधमाला दिघंचीत लॉजमध्ये सकाळी ११ वाजता खोली देण्यात आली. त्यामुळे तिथे त्या मुलीवर अत्याचार झाला. आटपाडीतल्या अनेक लॉजवर पोलिसांनी पाळत ठेवून कारवाई केली, तर अनेक घटना रोखल्या जाऊ शकतात. प्रत्यक्षात लॉजवर पोलिसांचे नियंत्रण नसल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळेच गुन्हे करणाºयांना लॉजची सुरक्षितता वाटू लागली आहे. 

आटपाडी तालुक्यात महिला आणि बालकांच्या, अल्पवयीन मुलींच्या लैंगिक गुन्ह्यांत मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली आहे. या नवीन वर्षात असे गुन्हे घडू नयेत यासाठी शाळा-महाविद्यालयांत आम्ही प्रबोधन करीत आहोत. मुलींना त्यांच्या हक्कांची जाणीव करून देऊन, प्रबोधन करीत आहोत.- आप्पासाहेब कोळी, पोलीस निरीक्षक, आटपाडीसमाजाचा स्तर खालावत चालला आहे. मुलांवर होणारे संस्कार महत्त्वाचे आहेत. विचारांची पातळी एवढी खालावली आहे की, मुलींचे वयही नराधम पाहत नाहीत. आई-वडिलांनी मुलांना काय-काय खबरदारी घ्यायची, हे घरीच सांगितले पाहिजे. मुली गाफील राहिल्या, तर हे प्रमाण वाढतच जाईल.- अ‍ॅड. अनघा कुलकर्णी, अध्यक्षा, महिला संरक्षण समिती, आटपाडी

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSangliसांगली