आटपाडीत डाळिंब सौदे पुन्हा सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:19 IST2021-06-03T04:19:41+5:302021-06-03T04:19:41+5:30
पहिल्याच दिवशी डाळिंबाची आवक चांगली झाली. चांगल्या प्रतीच्या डाळिंबांना ८० ते १०० रुपये प्रतीकिलो असा दर ...

आटपाडीत डाळिंब सौदे पुन्हा सुरू
पहिल्याच दिवशी डाळिंबाची आवक चांगली झाली. चांगल्या प्रतीच्या डाळिंबांना ८० ते १०० रुपये प्रतीकिलो असा दर मिळाला.
बाजार समितीत सरासरी दररोज पाच ते सात हजार क्रेट एवढी डाळिंबाची आवक होते. बुधवारी ३८०० क्रेट डाळिंबाची आवक झाली. सकाळी सात ते अकरा वेळेत सौदे झाले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एक मेपासून डाळिंब सौदे बंद होते. त्यामुळे शेतकऱ्यांची अडचण झाली होती. या पार्श्वभूमीवर सभापती भाऊसाहेब गायकवाड
यांनी व्यापारी, अडतदार आणि शेतकऱ्यांची बैठक घेऊन सूचना केल्या. कोरोना संसर्गाच्या वाढत्या
प्रादुर्भावामुळे जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी जिल्ह्यातील
सर्वच कृषी उत्पन्न बाजार समिती १ मेपासून बंद ठेवण्याचे आदेश
दिले होते. आटपाडी बाजार समितीत
शनिवार वगळता आठवडाभर
चालणारे डाळिंबाचा सौदे बंद ठेवले होते. या बाजार समितीत दिवसाला
पाच ते सात हजार डाळिंब क्रेटची आवक होते. ४० ते ५० लाख रुपयांची
उलाढाल होते. बाजार बंद असल्यामुळे
डाळिंब विक्रीची समस्या निर्माण झाली
होती. नुकसानही झाले.
चौकट
संख्या नियंत्रणात आल्याने निर्णय
आटपाडी शहरासह तालुक्यात कोरोना बाधितांची संख्या नियंत्रणात
आल्यामुळे जिल्हाधिकारी डॉ. चौधरी यांनी बाजार
समिती सुरू करण्याचे
आदेश दिले. त्यामुळे बुधवारपासून पुन्हा सौद्यांसाठी सर्व आवार स्वच्छ करून सौद्यांना सुरुवात झाली.