आटपाडी पोलिसांकडून अवैध दारू विक्रेत्यांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:32 IST2021-09-15T04:32:07+5:302021-09-15T04:32:07+5:30
आटपाडी : आटपाडी तालुक्यातील खरसुंडी येथे हातभट्टीची दारू विक्री करत असताना सूरज जितेंद्र जाधव (२४, रा. खरसुंडी) यास ताब्यात ...

आटपाडी पोलिसांकडून अवैध दारू विक्रेत्यांवर कारवाई
आटपाडी : आटपाडी तालुक्यातील खरसुंडी येथे हातभट्टीची दारू विक्री करत असताना सूरज जितेंद्र जाधव (२४, रा. खरसुंडी) यास ताब्यात घेत एक हजार १८५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याबाबत पोलीस सचिन लोंढे यांनी फिर्याद दिली आहे.
ही पोलीस निरीक्षक भानुदास निंभोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस फोजदार पंढरीनाथ भांगरे, महेश आवळे, संतराम वगरे यांनी केली आहे. लिंगीवरे येथील भोकरे वस्ती येथे ताडी दारू विक्री करणारा प्रवीण किसन भोकरे (४०, रा. भोकरे वस्ती, लिंगीवरे) याला अटक करून एकूण १५ लिटर ७५० रुपयांची ताडी जप्त करण्यात आली आहे. याबाबतची फिर्याद पोलीस नाईक नितीन मोरे यांनी दिली आहे. कारवाई पोलीस निरीक्षक भानुदास निंभोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.काॅ. संतोष जाधव, पो.ना. नितीन मोरे यांनी केली. दरम्यान, आटपाडी तालुक्यात अवैध धंद्यांवर कडक कारवाई करण्याचे संकेत पोलीस निरीक्षक भानुदास निंभोरे यांनी दिले आहेत.