आटपाडीत मनसेचा आमसभेसाठी आंदोलनाचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:23 IST2021-02-15T04:23:07+5:302021-02-15T04:23:07+5:30
करगणी : खानापूर-आटपाडीचे आमदार अनिल बाबर यांनी पंधरा दिवसाच्या आत आमसभा घ्यावी अन्यथा आटपाडी तालुका मनसेच्या वतीने तीव्र आंदोलनाचा ...

आटपाडीत मनसेचा आमसभेसाठी आंदोलनाचा इशारा
करगणी : खानापूर-आटपाडीचे आमदार अनिल बाबर यांनी पंधरा दिवसाच्या आत आमसभा घ्यावी अन्यथा आटपाडी तालुका मनसेच्या वतीने तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. याबाबतचे निवेदन आटपाडीचे गटविकास अधिकारी यांना देण्यात आले आहे.
आमदार बाबर यांनी एकदाही आमसभा घेतली नसून तालुक्यातील नागरिकांचे असणारे प्रश्न सोडवण्यासाठी आमसभा घेणे गरजेचे आहे. कोरोना काळात लोकांचे हाल झाले असून, त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी आमसभा घ्यावी, अशी मनसेने मागणी केली आहे. येत्या पंधरा दिवसात आम सभा घ्यावी अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
यावेळी मनसेचे सांगली जिल्हा उपाध्यक्ष सत्यवान पिंजारी, जिल्हा सचिव राजेश जाधव, आटपाडी तालुका कृषी सेल अध्यक्ष प्रकाश गायकवाड, मनसेचे आटपाडी तालुकाध्यक्ष संजय पाटील उपस्थित होते.