शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

बृहन्मुंबई महानगरपालिकेत नोकरीच्या आमिषाने आटपाडीच्या कुटुंबाची ६ लाखांची फसवणूक; बनावट आदेश, खोटे शिक्के व स्वाक्षऱ्यांचा वापर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2026 17:14 IST

चार जणांविरोधात गुन्हा दाखल

आटपाडी: बृहन्मुंबई महानगरपालिकेत नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून आटपाडी तालुक्यातील एका कुटुंबाची तब्बल सहा लाख पन्नास हजार रुपयांची फसवणूक केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी चार जणांविरोधात आटपाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, बनावट शासकीय कागदपत्रे, खोटे शिक्के व बनावट स्वाक्षऱ्यांचा वापर झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.याबाबत सविस्तर माहिती अशी की, साहेबराव महादेव वाघमारे (वय ४९, व्यवसाय – ड्रायव्हर, रा. आवळाई, ता. आटपाडी, जि. सांगली) यांनी आटपाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. आरोपी अरविंद भगवान शिकतोडे, सुनील शिकतोडे, राजू शिलवंत आणि राजू शिलवंत यांचा मेव्हणा (सर्व राहणार माहीत नाही) यांनी फिर्यादीच्या मुलाला, आनंद, यास बृहन्मुंबई महानगरपालिकेत नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन देऊन वेळोवेळी एकूण ६,५०,००० रुपये घेतले.दि. १७ फेब्रुवारी २०२३ ते दि. ८ नोव्हेंबर २०२४ या कालावधीत आरोपींनी ही रक्कम स्वीकारली. त्यानंतर बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या उपआयुक्त कार्यालयाचा बनावट शिक्का, प्रशासकीय अधिकारी (समिती) यांच्या बनावट स्वाक्षऱ्या वापरून खोटे कार्यालयीन आदेश तसेच बनावट ओळखपत्र तयार करून दिले. मात्र, प्रत्यक्षात फिर्यादीच्या मुलाला कोणतीही नोकरी मिळाली नाही. वारंवार पैसे परत मागूनही आरोपींनी टाळाटाळ केली. अखेरीस, आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादीने दि. १२ जानेवारी २०२६ रोजी आटपाडी पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे.या प्रकरणाचा पुढील तपास आटपाडी पोलिस करत असून, नोकरी लावण्याच्या नावाखाली सुरू असलेल्या फसवणुकीच्या प्रकारांपासून नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिस पथके प्रयत्नशील असून, हा गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने तपासाला वेग देण्यात आला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Atpadi family defrauded of ₹6 lakh with job promise in Mumbai.

Web Summary : A family from Atpadi was defrauded of ₹6.5 lakh with the false promise of a job in the Brihanmumbai Municipal Corporation. Forged documents and signatures were used. Police have registered a case and are investigating the four accused, warning citizens to be cautious of such scams.