एटीएम फोडणाऱ्या संशयितास काही तासांत पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:30 IST2021-01-08T05:30:30+5:302021-01-08T05:30:30+5:30

एटीएम फोडणारा नरसिंह कृष्णा साकिन (३२) हा बेघर असून वृदांवन हॉटेल परिसरात रस्त्यावरच त्याचे वास्तव्य आहे. बुधवारी पहाटे ...

The ATM burglar suspect was caught within hours | एटीएम फोडणाऱ्या संशयितास काही तासांत पकडले

एटीएम फोडणाऱ्या संशयितास काही तासांत पकडले

एटीएम फोडणारा नरसिंह कृष्णा साकिन (३२) हा बेघर असून वृदांवन हॉटेल परिसरात रस्त्यावरच त्याचे वास्तव्य आहे. बुधवारी पहाटे त्याने सिंडीकेट बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला. लॉक निघाले नसल्याने रागाने एटीएमची तोडफोड करून पळ काढला. नरसिंह याने हे कृत्य केले असल्याची पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर चार तासांतच पोलिसांनी या आरोपीस अटक केली. बँकेतील सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याने पोलिसांनी बँकेस हलगर्जीपणाबद्दल नोटीस बजावली आहे. सीसीटीव्ही बंद असतानाही पोलीस निरीक्षक राजू ताशिलदार सहाय्यक निरीक्षक नितीन सावंत, विष्णू काळे, संदीप नाईक, अभिजीत पाटील, नागेश मासाळ, लक्ष्‍मण जाधव यांच्या पथकाने एटीएम फोडणाऱ्या आरोपीस काही तासांतच पकडले.

फाेटाे : ०७ नरसिंह साकिन

Web Title: The ATM burglar suspect was caught within hours