प्रवाहाविरुद्ध पोहून अथर्वने गाठले लक्ष्य!
By Admin | Updated: February 16, 2015 23:10 IST2015-02-16T22:18:47+5:302015-02-16T23:10:08+5:30
धरमतर ते गेटवे : ३५ किलोमीटर अंतर १० तास १९ मिनिटांत पार

प्रवाहाविरुद्ध पोहून अथर्वने गाठले लक्ष्य!
सातारा : पोदार इंटरनॅशनल स्कूल सातारच्या अथर्व मिलिंद शिंदे याने धरमतर ते गेटवे आॅफ इंडिया मुंबई हे सागरी ३५ किलोमीटर अंतर १० तास १९ मिनिटे ४१ सेकंदांत पोहून पार केले. धरमतर मधून सकाळी ४.२८ मिनिटांनी अथर्व ने आपल्या मोहिमेला सुरुवात केली. अथर्वने गेली महिना भरापासून धरमतर खाडी ते गेटवे आॅफ इंडिया मुंबई हे सागरी ३५ किलोमीटर अंतर पार करण्यासाठी अथक परिश्रम घेतले होते. समुद्राच्या प्रवाहाविरोधात पोहायचे होते त्याने न घाबरता महासागरात झेप घेतली आणि सातारच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला. यावेळी त्याला चेअरअप करण्यासाठी पोदारचे प्राचार्य एस. एन. साहू, पोदार एज्युकेशन ट्रस्टचे अधिकारी शिवाळकर, प्रशासकीय व्यवस्थापक मनोज जाधव, क्रीडा शिक्षिका सुमेधा साबळे व अमित वानखडे, तसेच आ. शशिकांत शिंदे व त्यांच्या पत्नी वैशाली शिंदे, अध्यक्ष राज्य जलतरण संघटनेचे सुधाकर शानबाग, राज्य जलतरण संघटना सचिव राजू पालकर तसेच माजी आ. सदाशिव सपकाळ, वसंत मानकुमरे, ठाण्याचे तहसीलदार संदीप माने उपस्थित होते.
पोदार इंटरनॅशनल स्कूल सांताकुजचे विद्यार्थी त्याचे प्रशिक्षक सतीश कदम, दिनकर सावंत, विजय भिलारे, भगवान चोरगे, नाना गुजर, राहुल गुजर हे ही यावेळी उपस्थित होते. अथर्व ने आपल्या मोहिमेतून ‘सेव्ह दे नेचर’चा ही संदेश दिला. ‘वाढती वृक्षतोड थांबवा मॅगरोज बचाव’चा नारा देत अथर्व धरमतर ते गेटवे आॅफ इंडिया मुंबई याठिकाणी
पोहोचला. (प्रतिनिधी)