शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

सांगली : कृष्णा-वारणेत होणार उद्या अटलजींच्या अस्थींचे विसर्जन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2018 17:00 IST

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या अस्थींचे हरिपूर येथील कृष्णा -वारणा संगमावर उद्या, शुक्रवारी विसर्जन करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देकृष्णा-वारणेत होणार उद्या अटलजींच्या अस्थींचे विसर्जनजनतेच्या दर्शनासाठी गाडगीळ यांच्या जनसंपर्क कार्यालयात अस्थिकलश

सांगली : माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या अस्थींचे हरिपूर येथील कृष्णा -वारणा संगमावर उद्या, शुक्रवारी विसर्जन करण्यात येणार आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब पाटील-दानवे यांनी पालकमंत्री सुभाष देशमुख आणि सांगलीचे भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार सुधीर गाडगीळ यांच्याकडे अटलजींचा अस्थीकलश सुपूर्द केला. मुंबईहुन गुरुवारी अटलजींचा अस्थिकलश सांगलीत आमदार गाडगीळ यांच्या जनसंपर्क कार्यालयात ठेवण्यात आला होता. या अस्थीकलशाचे पूजन आमदार सुधीर गाडगीळ यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी महापौर संगिता खोत, उपमहापौर धीरज सूर्यवंशी, महानगरपालिकेतील गटनेते युवराज बावडेकर, माजी आमदार दिनकरतात्या पाटील, शेखर इनामदार, निताताई केळकर, प्रकाश बिरजे, मकरंद देशपांडे, शरद नलवडे, मुन्ना कुरणे, मोहन व्हनखंडे, मोहन वाटवे, विठ्ठल खोत, नगरसेवक गणेश माळी, प्रकाश ढंग, सोनाली सागरे, कल्पना कोळेकर, संजय कुलकर्णी, विनायक सिंहासने, संदीप आवटी, निरंजन आवटी, आनंदा देवमाने, गायत्री कल्लोळी, सुबाव मद्रासी, सविता मदने, तसेच भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.अटलजींचा अस्थिकलश जनतेच्या दर्शनासाठी शुक्रवारी सकाळी ९ वाजेपर्यंत आमदार सुधीर गाडगीळ यांच्या विश्रामबाग येथील जनसंपर्क कार्यालयात ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर हरिपूर येथील कृष्णा-वारणा नदीच्या पवित्र संगमावर या कलशातील अस्थींचे विसर्जन करण्यात येणार आहे.यावेळी जिल्हाचे  खासदार, आमदार, महानगर पालिकेचे महापौर, उपमहापौर व नगरसेवक,  जिल्हापरिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष व  सदस्य, पंचायत समिती सभापती, उपसभापती व सदस्य, तसेच ग्रामपंचायत सरपंच व सदस्य व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.

टॅग्स :Atal Bihari Vajpayeeअटलबिहारी वाजपेयीSangliसांगली