अटलबिहारी वाजपेयी हे सर्वसमावेशक नेतृत्व
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:31 IST2021-08-17T04:31:32+5:302021-08-17T04:31:32+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : भिन्न विचारांच्या लोकांशीही विचारविनिमय करुन निर्णय घेणारे अटलबिहारी वाजपेयी हे सर्वसमावेशक नेतृत्व होते, असे ...

अटलबिहारी वाजपेयी हे सर्वसमावेशक नेतृत्व
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : भिन्न विचारांच्या लोकांशीही विचारविनिमय करुन निर्णय घेणारे अटलबिहारी वाजपेयी हे सर्वसमावेशक नेतृत्व होते, असे मत आमदार सुधीर गाडगीळ यांनी व्यक्त केले.
भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची पुण्यतिथी आमदार गाडगीळ यांच्या कार्यालयात साजरी करण्यात आली. यावेळी गाडगीळ म्हणाले की, अटलबिहारी वाजपेयी यांचा पंतप्रधानपदाचा कालावधी हा देशाच्या विकासासाठी महत्त्वाचा होता. अणुस्फोट, कारगील युद्ध असे अनेक अडचणींचे मुद्दे केंद्र सरकारसमोर होते आणि २७ घटक पक्षांना बरोबर घेऊन या प्रश्नांना सामोरे जायचे होते. पण वाजपेयी यांचे नेतृत्व सर्वसमावेशक होते. भिन्न विचारांच्या लोकांशी विचारविनिमय करून ते निर्णय घेत असत. त्यामुळे पंतप्रधानपदाची त्यांची कारकीर्द यशस्वी ठरली.
आमदार गाडगीळ यांच्या हस्ते वाजपेयी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी धीरज सूर्यवंशी, प्रकाश बिरजे, श्रीकांत शिंदे, प्रवक्ते मुन्ना कुरणे, दीपक माने, अजित वाझे, गणपती साळुंखे उपस्थित होते.