राष्ट्रीय कुटुंब अर्थसाहाय्य योजनेतून दहा कुटुंबांना मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:29 IST2021-02-16T04:29:02+5:302021-02-16T04:29:02+5:30
इस्लामपूर : वाळवा तालुक्यातील कर्त्या व्यक्तीचे निधन झालेल्या दहा कुटुंबांना राष्ट्रीय कुटुंब अर्थसाहाय्य योजनेतून संजय गांधी निराधार योजना समितीच्या ...

राष्ट्रीय कुटुंब अर्थसाहाय्य योजनेतून दहा कुटुंबांना मदत
इस्लामपूर : वाळवा तालुक्यातील कर्त्या व्यक्तीचे निधन झालेल्या दहा कुटुंबांना राष्ट्रीय कुटुंब अर्थसाहाय्य योजनेतून संजय गांधी निराधार योजना समितीच्या वतीने जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते प्रत्येकी २० हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला. यावेळी प्रांताधिकारी नागेश पाटील, तहसीलदार रवींद्र सबनीस, संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष संजय पाटील उपस्थित होते.
दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील शोभा सूर्यवंशी इस्लामपूर, रहेमान मुल्ला नेर्ले, नंदूबाई माळी कासेगाव, सविता चव्हाण इस्लामपूर, सन्मती भागवत आष्टा, सुनीता सोनवणे आष्टा, सुरेश घस्ते मालेवाडी, दिलीप कळसकर इस्लामपूर, स्वाती टिबे इस्लामपूर, शोभा शिंदे इस्लामपूर यांना हे धनादेश देण्यात आले.
यावेळी प्रा.श्यामराव पाटील, आर. डी. सावंत, बाळासाहेब पाटील, संभाजी कचरे, खंडेराव जाधव, अनिल साळुंखे, संजय खवळे, समितीच्या नायब तहसीलदार धनश्री भांबुरे, महसूल सहायक बी. एम. कदम, जयंत दारिद्र्य निर्मूलन समितीचे समन्वयक इलियास पिरजादे, राजाराम जाधव उपस्थित होते.
फोटो ओळी- राजारामनगर येथे दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना मदतीचा धनादेश जयंत पाटील यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी संजय पाटील, नागेश पाटील, रवींद्र सबनीस उपस्थित होते.