बागणी ग्रामपंचायतीस शिकलगार कुटुंबीयांतर्फे मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:32 IST2021-08-17T04:32:48+5:302021-08-17T04:32:48+5:30
बागणी : बागणी (ता. वाळवा) येथील अभियंते सादिक शिकलगार व उस्मान शिकलगार यांनी शहारूमबी शिकलगार व हामजेखान शिकलगार यांच्या ...

बागणी ग्रामपंचायतीस शिकलगार कुटुंबीयांतर्फे मदत
बागणी : बागणी (ता. वाळवा) येथील अभियंते सादिक शिकलगार व उस्मान शिकलगार यांनी शहारूमबी शिकलगार व हामजेखान शिकलगार यांच्या समरणार्थ ग्रामपंचायतीस डास प्रतिबंध फवारणी मशीन भेट दिली.
पावसाळ्यात होणारा डासांचा प्रादुर्भाव व त्यामुळे होणाऱ्या रोगांना पायबंद घालण्यासाठी व नागरिकांचे आरोग्य चांगले राहावे म्हणून ग्रामपंचायतीला ही भेट दिल्याचे शिकलगार यांनी सांगितले.
सरपंच संतोष घनवट यांनी शिकलगार कुटुंबीयांकडून सामाजिक बांधीलकी म्हणून ग्रामपंचायतीला फॉगर्स मशीन भेट दिल्याबद्दल शिकलगार कुटुंबीयांचे आभार मानले, तसेच सरपंच संतोष घनवट व उपसरपंच विष्णू किरतसिंग यांच्याहस्ते शिकलगार कुटुंबीयांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सादिक शिकलगार, उस्मान शिकलगार, यासर तांबोळी, कादर शिकलगार उपस्थित होते.
160821\1613-img-20210816-wa0005.jpg
15 ऑगस्ट च्या कार्यक्रमात फॉगर्स एक्सल मशीन ग्रामपंचायतीला प्रदान करताना उस्मान शिकलगार, सरपंच संतोष घनवट व मान्यवर