आंधळीच्या पाणी याेजनेसाठी साेनहिरा रुरल फाउंडेशनची मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:33 IST2021-06-09T04:33:36+5:302021-06-09T04:33:36+5:30
ओळ : आंधळी (ता. पलुस) येथील पाणी याेजनेच्या नूतनीकरणासाठी साेनहिरा रुरल फाउंडेशनतर्फे चार लाखाचा निधी विश्वजित कदम यांनी सरपंच ...

आंधळीच्या पाणी याेजनेसाठी साेनहिरा रुरल फाउंडेशनची मदत
ओळ : आंधळी (ता. पलुस) येथील पाणी याेजनेच्या नूतनीकरणासाठी साेनहिरा रुरल फाउंडेशनतर्फे चार लाखाचा निधी विश्वजित कदम यांनी सरपंच अमित चव्हाण यांच्याकडे सुपूर्द केला.
पलूस : आंधळी (ता. पलूस) येथील पाणी पुरवठा योजनेच्या नूतनीकरणासाठी सोनहिरा रुरल फाउंशनच्या वतीने चार लाख रुपयांचा धनादेश सहकार व कृषी राज्यमंत्री डाॅ. विश्वजित कदम यांनी आंधळीचे सरपंच आमित चव्हाण यांच्याकडे सुपूर्द केला.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर डाॅ. कदम यांनी आंधळी गावास भेट दिली होती. त्यावेळी नागरिकांनी गावातील विविध प्रश्न उपस्थित केले हाेते. गावाच्या पाणी योजनेच्या येरळा नदीतील जॅकवेलमध्ये मोठ्या प्रमाणावर गाळ साचल्याने पाणी पुरवठ्यास अडथळा निर्माण होत आहे. हा गाळ काढण्यासाठी व आरसीसी बांधकाम करण्यासाठी निधीची मागणी केली हाेती. यावर डाॅ. कदम यांनी सोनहिरा रुरल फाउंशनच्या वतीने चार लाखांचा निधी पाणी योजनेच्या कामासाठी ग्रामपंचायतीकडे सुपूर्द केला. या निधीतून पाणी पुरवठा योजनेचे जॅकवेलचे काम तात्काळ पूर्ण होईल व गावास सुरळीत पाणी पुरवठा सुरु होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी जिल्हा बँकेचे संचालक महेंद्र लाड, तहसीलदार निवास ढाणे, सरपंच अमित चव्हाण, उपसरपंच माणिक माने, बजरंग जाधव, विजय पवार, अशोक कदम, बबन पाटील, प्रकाश माने, महेश जाधव, अक्षय पवार, ब्रह्मानंद माने, कुसुम कदम, ग्रामसेविका सुरेखा पवार उपस्थित होते.