सुधार समितीला अमेरिकेतून ऑक्सिजन कॉन्संट्रेटरची मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:34 IST2021-06-09T04:34:35+5:302021-06-09T04:34:35+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : कोरोना रुग्णांना उपचारानंतर घरी आल्यावर ऑक्सिजनची गरज पडत आहे. त्यासाठी अमेरिकेतील सांगलीकर अरविंद शिंगी, ...

सुधार समितीला अमेरिकेतून ऑक्सिजन कॉन्संट्रेटरची मदत
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : कोरोना रुग्णांना उपचारानंतर घरी आल्यावर ऑक्सिजनची गरज पडत आहे. त्यासाठी अमेरिकेतील सांगलीकर अरविंद शिंगी, अभिजित पाटील, गजानन गायकवाड, प्रणव गरवारे, अनंत श्रीवास्तव यांनी लोकधर्म फाउंडेशनच्या माध्यमातून सुमारे आठ लाखांची सात ऑक्सिजन कॉन्संट्रेटर मशीन सांगली जिल्हा सुधार समितीकडे पाठविली आहेत.
ती गरजू रुग्णांना मोफत उपलब्ध करून देणार असल्याचे अध्यक्ष ॲड. अमित शिंदे यांनी सांगितले. नोकरीनिमित्त अमेरिकेत असलेल्या सांगलीकरांशी शिंदे व उपाध्यक्ष जयंत जाधव यांनी चर्चा केली. अमेरिकन मित्रांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला. ही मशीन अमेरिकेतून सांगलीत येईपर्यंत अनेक कागदपत्रे व पैसे यांमुळे सुमारे २२ दिवस ही प्रक्रिया चालली. मंगळवारी ही यंत्रसामग्री जिल्हा सुधार समितीला प्राप्त झाली.
अमेरिकेतील म्हैसाळचे अरविंद शिंगी, ऐतवडे खुर्दचे अभिजित पाटील, सांगलीचे गजानन गायकवाड, प्रणव गरवारे, अनंत श्रीवास्तव यांनी लोकधर्म फाउंडेशनच्या माध्यमातून मदतीचा हात दिला. गरजू रुग्ण, त्यांच्या नातेवाइकांनी मशीनसाठी सांगली जिल्हा सुधार समितीशी संपर्क साधावा, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी सचिव संजय काळोखे, महालिंग हेगडे, उदय निकम, प्रवीण कोकरे, रोहित शिंदे, विनायक बलोलदार, बापू कोळेकर, किरण जुगदर, रूपेश घोटीलकर उपस्थित होते.